ISRO Recruitment 2022: इस्रोमध्ये विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज

नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये JRF, RA आणि रिसर्च सायंटिस्टसाठी एकूण 55 जागा आहेत.
ISRO Recruitment 2022
ISRO Recruitment 2022Sakal
Updated on

ISRO Recruitment 2022: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अंतर्गत कार्य करणाऱ्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) ने ज्युनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट आणि रिसर्च सायंटिस्ट पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये JRF, RA आणि रिसर्च सायंटिस्टसाठी एकूण 55 जागा आहेत. या भरतीसाठी, तुम्ही नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRC) nrsc.gov.in च्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मे 2022 आहे. (ISRO Recruitment 2022: Jobs in National Remote Sensing Center-NRSC)

रिक्त जागांचा तपशील-

  • ज्युनियर रिसर्च फेलो – 12 पदे

  • रिसर्च असोसिएट - 2 पदे

  • संशोधन शास्त्रज्ञ- 41 पदे

ISRO Recruitment 2022
HPCL Technicians Recruitment 2022: हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज

शैक्षणिक पात्रता-

  1. JRF - सिव्हिल इंजीनियरिंगमध्ये B.Tech/BE सोबत रिमोट सेन्सिंग/जीआईएस/रिमोट सेन्सिंग तसेच GIS/Geoinformatics/Geospatial Technology/Spatial Information Technology मध्ये एमटेक/एमई किंवा अॅग्रीकल्चरमध्ये एमएस्सी झालेलं असावं.

  2. रिसर्च असोसिएट- संबंधित विषयात एमएससी आणि बीएससीसर वनस्पतिशास्त्र/पर्यावरणशास्त्र/वनशास्त्र/पर्यावरण विज्ञान/वन्यजीव जीवशास्त्र या विषयात पीएचडी

  3. रिसर्च सायंटिस्ट- रिमोट सेन्सिंग/GIS/रिमोट सेन्सिंग आणि GIS/Geoinformatics/Geomatics/Geospatial Technology/Spatial Information Technology मध्ये ME किंवा M.Tech.

ISRO Recruitment 2022
MPSC 2022: ४५ पदांसाठी होणार भरती; आयोगाने मागवले अर्ज

कुठे असेल पोस्टींग-

निवड झालेल्या उमेदवारांना NRSC-Geo सेंटर, शादनगर कॅम्पस, रंगारेड्डी जिल्हा, तेलंगणा किंवा NRSC, बालानगर हैदराबाद येथे पोस्टींग मिळू शकते. तथापि, NRSC ने उमेदवारांना जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भारतात कुठेही पोस्ट करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.