चांद्रयान-3, आदित्य अशा मोठ्या मोहिमांच्या यशामुळे इस्रोचं नाव जगभरात चमकलं आहे. यामुळेच भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेमध्ये काम करण्यासाठी आता कित्येक तरुण-तरुणी इच्छुक आहेत. इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रावर मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे.
याठिकाणी हलके वाहन चालक-अ आणि अवजड वाहन चालक-ब या पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया 13 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर आहे.
सध्या याठिकाणी 18 पदे रिक्त आहेत. यातील 9 जागा हलके वाहन चालक आणि 9 जागा अवजड वाहन चालक या पदांसाठी आहेत. हलके वाहन चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वैध एलव्हीडी लायसन्स असणं गरजेचं आहे. तसंच तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव देखील आवश्यक आहे.
अवजड वाहन चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावाराकडे वैध एचव्हीडी लायसन्स असणं गरजेचं आहे. सोबतच, उमेदवाराकडे वैध सार्वजनिक सेवा परवाना असणं गरजेचं आहे. या दोन्ही पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी/एसएसएलसी/एसएससी/मॅट्रिक उत्तीर्ण असणं गरजेचं आहे.
अर्ज करण्यासाठी सर्वात आधी ISRO VSSCच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
त्यानंतर ISRO VSSC Recruitment 2023 या लिंकवर क्लिक करा.
याठिकाणी रजिस्ट्रेशन करा.
पुढे गेल्यानंतर अर्ज भरा आणि आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा.
अर्जाची फी भरा.
फॉर्म तपासून सबमिट बटणावर क्लिक करा. हा फॉर्म प्रिंट करून घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.