ITBP Nurse Recruitment : परिचारिकांची भरती; मिळणार १ लाखाहून अधिक पगार

या भरतीद्वारे निवडलेल्या उमेदवारांना देशाच्या कोणत्याही भागात पोस्ट केले जाईल.
ITBP Staff Nurse Recruitment
ITBP Staff Nurse Recruitmentgoogle
Updated on

मुंबई : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP) ने ग्रुप बी मध्ये सब इन्स्पेक्टर स्टाफ नर्सच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. स्टाफ नर्सच्या भरतीसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार ITBP Recruitment recruitment.itbpolice.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

या भरतीद्वारे स्टाफ नर्सच्या १८ जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीद्वारे निवडलेल्या उमेदवारांना देशाच्या कोणत्याही भागात पोस्ट केले जाईल. भरतीमध्ये पदांची संख्या वाढवता किंवा कमी करता येऊ शकते, याची माहिती वेबसाइटद्वारे दिली जाई. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया १७ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२२ आहे. (ITBP Staff Nurse Recruitment 2022)

ITBP Staff Nurse Recruitment
IBPS Recruitment : ६ बँकांमध्ये हजारो पदांवर भरती प्रक्रिया सुरू

ITBP सब इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स) भरती २०२२ रिक्त जागा तपशील

एकूण पदे- १८

अनारक्षित श्रेणी – ११ पदे

SC- १ पद

ST- २ पदे

OBC- २ पदे

EWS- २ पदे

पगार

३५ हजार ४०० - रु. १ लाख १२ हजार ४००

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची तारीख - १७ ऑगस्ट २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ सप्टेंबर २०२२

ITBP Staff Nurse Recruitment
नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक आहेत ही १० कौशल्ये

वय मर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची किमान वयोमर्यादा २१ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे. यासोबतच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. अधिक तपशीलांसाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचना वाचू शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराकडे मान्यताप्राप्त बोर्डाचे १२वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे याची खात्री करा. यासोबतच उमेदवारांना परिचारिका म्हणून ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज फी

सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २०० रुपये भरावे लागतील, तर महिला उमेदवार, SC आणि ST श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. फी भरण्यासाठी ऑनलाइन मोड वापरावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.