Pune Admission Update - नोकरीच्या शाश्वतीबरोबरच स्वत-चा व्यावसाय सुरू करण्यासाठी विद्यार्थी आता कौशल्य विकास अभ्यासक्रमांना पसंती देत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ साठी पुणे जिल्ह्यात आयटीआय प्रवेशाच्या तब्बल १२ हजार ५३२ जागा उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना ११ जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यु.के सुर्यंवशी यांनी यासंबंधीचे परिपत्रक काढले आहे. ते म्हणतात, ‘पदवी, पदव्युत्तर शिक्षणानंतरही नोकरी मिळेल याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे विद्यार्थी कौशल्य विषयक शिक्षण घेण्यासाठी आयटीआयकडे वळत आहेत.
अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर त्यांना स्वत- चा उद्योग किंवा व्यवसाय उभारता येतो. तसेच या क्षेत्रात करिअरसाठी ८० पेक्षा जास्त ट्रेड उपलब्ध आहेत’ अभियांत्रिकी व सर्वसाधारण अशा ग्रुप मध्ये एक व दोन वर्षांचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
आयटीआयच्या जागांचे विवरण -
- जिल्ह्यात १६ सरकारी आणि ४३ खासगी आयटीआय
- सरकारीमध्ये ५७४० जागा आणि खासगीत ६७९२ जागा
- सर्वाधिक सरकारी जागा १९८४ या पुणे शहरात
- खासगी आयटीआयमध्ये हवेली तालुका अव्वल १५ आयटीआयमध्ये २२२४ जागा
अर्जसाठीचे संकेतस्थळ -
https://admission.dvet.gov.in/Account/Registration
जिल्ह्यातील आयटीआयचे प्रवेश क्षमता -
तालुका - शासकीय - खाजगी
जुन्नर - - ३४४ - ९०४
आंबेगाव - २१६ - ०
शिरूर - १४४ - ७५२
खेड - ४२८ - १४०
मावळ - - ३४८ - ६०
मुळशी - १०४ - ३८०
हवेली - २७३ - २२२४
पुणे शहर - १९८४ - ३३६
दौंड -- - २४० - ७९६
पुरंधर - १४० - ८०
वेल्हे - १३२ - ०
भोर - १७२ - १००
बारामती - ४६४ - ६२४
इंदापूर - २९२ - ३९६
जिल्हा एकूण - ५७४० - ६७९२
(स्रोत - डीव्हीईटी ऑनलाईन ॲडमिशन)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.