JEE Main 2024 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) सत्र १ च्या संयुक्त प्रवेश परिक्षेचा (जेईई मेन २०२४) निकाल नुकताच जाहीर केला आहे. NTA ने आज पहाटे ३ वाजता जेईई मेन परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परिक्षेला बसलेले विद्यार्थी jeemain.nta.ac.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन निकाल आणि त्यांचा रॅंक चेक करू शकतात.
NTA प्राधिकरणाने त्यांची अधिकृत वेबसाईटवर (jeemain.nta.ac.in) JEE मुख्य परिक्षेचा निकाल डाऊनलोड करण्यासाठी लिंक देखील जारी केली आहे. विद्यार्थांना त्यांचा निकाल डाऊनलोड करायचा असेल तर या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करता येईल. त्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख मेंन्शन करावी लागेल.
जेईई मेन परिक्षेचे पहिले सत्र २४ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत चालले. यावर्षी तब्बल १२ लाख विद्यार्थ्यांनी IIT JEE परिक्षेसाठी अर्ज केले होते. जेईई मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी एनटीएने (NTA) जेईई मेनची उत्तरपत्रिका जाहीर केली होती. ही उत्तर पत्रिका पेपर १ साठी म्हणजेच BE किंवा B.Tech पेपरसाठी जारी करण्यात आली आहे.
बीआर्क आणि बी प्लॅनिंगसाठी NTA ने अद्याप पेपर २ साठीची उत्तरपत्रिका जाहीर केलेली नाही. पेपर २ साठी JEE मुख्य परिक्षेची उत्तर पत्रिका लवकरच ऑनलाईन अपडेट केली जाईल.
सर्वात आधी विद्यार्थ्यांनी jeemain.nta.ac.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
त्यानंतर, होमपेजवर जाऊन View score card किंवा View JEE Main 2024 result लिंक वर क्लिक करा.
आता पुढील विंडोवर जाऊन तुमचे लॉगइन क्रेडेन्शिअल्स (जन्मतारीख आणि अर्ज क्रमांक) टाका.
ही प्रक्रिया केल्यानंतर उमेदवाराला त्याचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
आता तुमचा निकाल चेक करा आणि डाऊनलोड करा.
तुम्ही या निकालाची प्रिंट देखील काढू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.