JEE MAINS 2024 : हा स्टडी प्लान फॉलो केल्यास 90 दिवसांच्या अभ्यासात क्रॅक कराल 'JEE MAINS'

आज आपण ९० दिवसांचा असा स्टडी प्लान समजून घेऊयात त्याच्या मदतीने तुम्ही सहज जेईई मेन क्रॅक करू शकाल
JEE MAINS 2024
JEE MAINS 2024 esakal
Updated on

JEE MAINS 2024 :

जेईई मेन्स २०२४ चे पहिले सेशन २४ जानेवारी पासून सुरू होणार असल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजंसी (एनटीए) द्वारे देण्यात आली आहे. तेव्हा आता इंजिनीयरींगमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडे अवघे तीन महिने उरलेत. तेव्हा मुलांना आता वेळेचे आणि अभ्यासाचे नियोजन करावे लागेल. जेईईमध्ये चांगला स्कोअर करण्यासाठी विद्यार्थ्यांस एक स्टडी प्लान तयार करण्याची गरज आहे. ज्यात मॉक टेस्टचा समावेश असावा. आज आपण ९० दिवसांचा असा स्टडी प्लान समजून घेऊयात त्याच्या मदतीने तुम्ही सहज जेईई मेन क्रॅक करू शकाल.

फॉलो करा हा स्टडी प्लान

सगळ्यात आधी स्टुडंट्सना जुन्या प्रश्नपत्रिका बघण्याची गरज आहे. यातून महत्वाचे टॉपिक्स आणि विचारले जाणारे प्रश्न यांचा पॅटर्न समजून घ्या. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचे, कमी महत्वाचे आणि त्याहून कमी महत्वाचे टॉपिक ठरवून घ्या. आणि त्यानुसार अभ्यासाला लागा.

सगळ्याच विषयांच्या महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष द्या

जेईई मेन परीक्षेत ४५ टक्के प्रश्न ११ वी आणि उर्वरीत ५५ टक्के प्रश्न बाराव्या वर्गाच्या सिलॅबसवर आधारित असतात. अशात विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या तिन्ही विषयांवर लक्ष देण्याची गरज आहे. या विषयांमधील बेसिक कॉन्सेप्ट्स क्लियर ठेवा. घोकंपट्टी करू नका.

JEE MAINS 2024
JEE Advance Exam: जेईई ॲडव्हान्सला विद्यार्थी मुकल्याची व्हावी चौकशी : रविंद्र तळपे

बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्या

जेईईमध्ये विचारले जाणारे बहुतेक प्रश्न कॉन्सेप्ट बेस्ड असतात. त्यामुळे घोकंपट्टी करून तुम्ही परीक्षेत चांगले गुण घेऊ शकत नाहीत. अशा पुस्तकांची मदत घ्या ज्यातून तुमचे बेसिक कॉन्सेप्ट चांगले क्लियर होतील.

शॉर्ट नोट्स बनवा

जेईई परीक्षेच्या तयारीत शॉर्ट नोट्स फार गरजेचे असतात. शॉर्ट नोट्स तयार करून त्याची रिव्हिजन करा. शॉर्ट नोट्सचा महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही अगदी कमी वेळात चांगली रिव्हिजन करू शकता. परीक्षेच्या आधीसुद्धा याची मदत होते. (Education)

JEE MAINS 2024
JEE NEET Exam Training : खुशखबर! आदिवासी विद्यार्थ्यांनाही मोफत जेईई, नीट प्रशिक्षण...

मॉक टेस्ट द्या

जेईई मेन्सदरम्यान काही महत्वाचे टॉपिक्स कव्हर झाल्यावर त्या विषयासंबंधित ऑनलाइन किंवा ऑफलाइन मॉक टेस्ट द्या. जेईईच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून बघा. नियमित मॉक टेस्ट दिल्यास तुमचा किती अभ्यास झालाय याचा अंदाज येतो. मॉक टेस्टनंतर निकालाचे विश्लेषण करा. ज्या प्रश्नांची उत्तरे चुकली असतील त्याची उत्तरे शोधा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()