Job News : लष्करात अधिकारी होण्याची संधी

उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही १८ ते ४२ वर्षे अशी आहे.
job
jobsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - तुम्ही नोकरी करत आहात, पण देशसेवेसाठी लष्करात जाण्याची इच्छा आहे... तर मग इकडे लक्ष द्या! नोकरी करत असलेल्या व्यक्तींसाठी लष्करात दाखल होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सैन्यदलाच्या प्रादेशिक सेना म्हणजेच ‘टेरिटोरियल आर्मी’मध्ये भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याद्वारे लष्करात अधिकारी म्हणून काम करण्याची संधी अनेकांना मिळणार आहे.

प्रादेशिक सेनेने अधिकारीपदासाठी भरती प्रक्रियेशी निगडित अधिकृत संकेतस्थळावर सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार कोणतीही पदवी असलेल्या मात्र नोकरी करणाऱ्या व्‍यक्तींना सैन्यदलात दाखल होत देशसेवा बजावता येणार आहे. ही प्रक्रिया महिला व पुरुष या दोन्ही उमेदवारांसाठी असून, यात १९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा आणि मुलाखती अशा दोन टप्प्यांत ही भरती प्रक्रिया पार पडेल. दरम्यान,

उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही १८ ते ४२ वर्षे अशी आहे. देशातील तरुणांना त्यांच्या प्राथमिक नोकरी किंवा व्यवसायाचा त्याग न करता लष्करात सेवा करण्यास सक्षम करण्याच्या संकल्पनेवर आधारित ही प्रक्रिया आहे. यामुळे लष्कराचे गणवेश परिधान करत देश सेवेची जबाबदारी पार पाडण्याचा अनुभवदेखील या तरुणांना मिळणार आहे. या प्रक्रियेशी निगडित अधिक माहिती तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.jointerritorialarmy.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.

job
Jobs in India: कामगारांच्या पगारात घट तर बेरोजगारांच्या संख्येत वाढ, धक्कादायक आकडेवारी आली समोर

अर्ज करण्यासाठी...

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

भारताचे नागरिकत्व आवश्यक

महत्त्वाच्या तारखा...

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची सुरुवात

२३ ऑक्टोबर २०२३

अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर २०२३

लेखी परीक्षा डिसेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.