TCS मध्ये बंपर भरतीनंतर आता 35 हजार पदवीधरांना मिळणार नोकरी

TCS Recruitment
TCS Recruitment esakal
Updated on
Summary

सध्या भारतातील अनेक IT कंपन्या इंजिनिअरिंग आणि इतर पदवीधर फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी देत आहेत.

TCS Recruitment : सध्या भारतातील अनेक IT कंपन्या इंजिनिअरिंग आणि इतर पदवीधर फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी देत आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) म्हणजेच, TCS ने 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 43 हजार फ्रेशर्सना काम करण्याची संधी दिलीय. आता पुढील सहामाहीत 35 हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे.

TCS जगातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान (IT) सेवा देणारी कंपनी आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस, टीसीएस 78 हजार पदवीधरांची भरती करण्याचे लक्ष्य साध्य करणार आहे. या दिशेने कंपनीने 35 हजार नवीन पदवीधरांच्या नियुक्तीसाठी नोटीस जाहीर केलीय. त्यामुळे अनेकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या कंपनीचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे.

TCS Recruitment
Indian Oil मध्ये 500 हून अधिक पदांसाठी भरती; 1 लाखापर्यंत मिळणार पगार

'टाटा'चे एचआर मिलिंद लक्कर (Milind Lakkar) म्हणाले, आम्ही गेल्या सहा महिन्यांत 43 हजार नवीन पदवीधरांची विक्रमी भरती केली. आमच्या शिफ्ट-लेफ्ट ट्रेनिंग स्ट्रॅटेजीमुळे हे घडले आहे. या प्रशिक्षणामुळे भरती प्रक्रियेला वेग आलाय. आम्ही जैविक प्रतिभा विकासावर लक्ष्य केंद्रीत केले असून करिअरसोबत शिक्षणाला जोडून कर्मचाऱ्यांना समाधान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. टीसीएस कंपनीने गेल्या तिमाहीत एकूण 19 हजार 690 कर्मचाऱ्यांची भरती केली. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 5 लाख 28 हजार 748 वर गेली आहे. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या 36.2 टक्के असल्याचंही त्यांनी सांगितलं.

TCS Recruitment
FCI मध्ये 860 जागांसाठी बंपर भरती; 8 वी विद्यार्थ्यांनाही करता येणार अर्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.