पदवीधरांसाठी मेट्रोमध्ये बंपर नोकऱ्या! जाणून घ्या सविस्तर

पदवीधरांसाठी मेट्रोमध्ये नोकऱ्या! जाणून घ्या सविस्तर
Metro
Metrosakal
Updated on
Summary

स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर, SC / TO व कनिष्ठ अभियंता आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी झाली आहे.

गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (Gujarat Metro Rail Corporation Limited - GMRC) स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर (SC / TO) व कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) आणि इतर पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. याअंतर्गत एकूण 118 पदांची भरती केली जाणार आहे. अशा परिस्थितीत या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले सर्व उमेदवार गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट gujaratmetrorail.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. (Job opportunities for graduates in Gujarat Metro Rail Corporation Limited)

Metro
विद्यापीठीय कर्मचारी संपामुळे लटकले 'पीएचडी' प्रवेश!

या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 22 डिसेंबरपासून सुरू झाली आहे आणि ती 21 जानेवारी 2022 रोजी संपेल. या पदांसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्याच वेळी, या पदांसाठी ऑनलाइन अर्ज शुल्क 21 जानेवारी 2021 पर्यंत भरता येईल. गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर (SC / TO) 71, कस्टमर रिलेशन असिस्टंट (CRA) : 11, कनिष्ठ अभियंता 3 आणि मेंटेनर 33 पदांची भरती केली जाईल.

जाणून घ्या पात्रता

कस्टमर रिलेशन असिस्टंट (CRA) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), गणित (Mathematics) या विषयात विज्ञान (Science) पदवी असणे आवश्‍यक आहे.

कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून मेकॅनिकल (Mechanical) / इलेक्‍ट्रिकल (Electrical) / इलेक्‍ट्रॉनिकमधील अभियांत्रिकी (Electronics Engineer) पदविका असणे आवश्‍यक आहे.

Metro
Online Education समजलेच नाही! दहावी-बारावीचे जादा तास सुरू

वयोमर्यादा

मेंटेनर (Maintainer) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावी. तर इतरांसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावी. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.