SBI Apprentice Recruitment 2021 : जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) काम करण्याची इच्छा बाळगली असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात असलेल्या शाखांमध्ये पात्र उमेदवारांकडून नोकरीसाठी अर्ज मागवत आहे. एसबीआयने अप्रेंटिसशिपसाठी (Apprentice) एकूण 6100 रिक्त जागा घोषित केल्या आहेत. दरम्यान, बँकेत अॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (sbi.co.in.) उपलब्ध असलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. एसबीआय अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज 6 जुलैपासून सुरू झाली असून उमेदवार 26 जुलै 2021 पर्यंत आपले अर्ज सबमिट करू शकतात. (SBI Apprentice Recruitment 2021 Notification Issued For 6100 Vacancies Apply Online At SBI Co In Careers From Today And By July 26)
जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) काम करण्याची इच्छा बाळगली असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
'ही' पात्रता असावी
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6100 अप्रेंटिस रिक्त पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थांकडून कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत उमेदवारांचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, एसबीआयने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत शिथिल करण्याची तरतूदही केली आहे.
अशी असेल निवड प्रक्रिया..
ऑनलाइन लेखी परीक्षा व स्थानिक भाषा परीक्षेच्या आधारे एसबीआयमध्ये अप्रेंटिससाठी उमेदवारांची निवड केली जाईल. ऑनलाइन लेखी परीक्षेमध्ये सर्वसाधारण / आर्थिक जागरूकता, सामान्य इंग्रजी, परिमाणात्मक दृष्टीकोन, संगणक योग्यता या विषयांचे एकूण 100 प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी 1 तासांचा असेल आणि एकूण विहित गुण 100 असतील. लेखी परीक्षेत 0.25 निगेटिव्ह चिन्हांकन देखील आहे. परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना स्थानिक भाषा चाचणीसाठी बोलवले जाईल. तद्नंतर निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला 15000 रुपये प्राथमिक वेतन दिले जाईल, असेही एसबीआयने स्पष्ट केलेय.
SBI Apprentice Recruitment 2021 Notification Issued For 6100 Vacancies Apply Online At SBI Co In Careers From Today And By July 26
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.