खुशखबर! इंडियन आर्मीत NCC भरती; तब्बल 2.50 लाख मिळणार पगार

Indian Army
Indian Armyesakal
Updated on
Summary

Indian Army NCC Entry : भारतीय सैन्य दलात नॅशनल कॅडेट कोअर अंतर्गत विशेष भरती निघालीय. शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

Indian Army Recruitment 2021 : तुमच्याकडे नॅशनल कॅडेट कोअर (एनसीसी) सर्टिफिकेट्स असेल, तर भारतीय लष्करात काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. इंडियन आर्मीने (Indian Army) शॉर्ट सर्व्हिस कमिशन (NCC) अंतर्गत एनसीसी स्पेशल विशेष भरती (Indian Army Vacancy) काढलीय. महिला आणि पुरुष दोघांसाठी ही भरती आहे.

Indian Army
भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी; 12 वी विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज

इंडियन आर्मीच्या एनसीसी 51 कोर्ससाठी (Indian Army NCC) ऑनलाइन अर्ज 5 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाले आहेत. तर, इच्छुक उमेदवार 3 नोव्हेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. शिवाय, तुम्ही भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाईटला joinindianarmy.nic.in भेट देऊनही अर्ज करू शकता.

Indian Army
JEE Main परीक्षेच्या पेपर दोनचा निकाल जाहीर; 'असा' पाहा Result

रिक्त पदांचा तपशील (Indian Army NCC 51 Vacancy 2021 Details)

या भरतीद्वारे एकूण 55 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यात एनसीसी पुरुषांसाठी 50 आणि एनसीसी महिलांसाठी 5 जागा असतील.

कोण अर्ज करू शकतो?

ज्यांच्याकडे एनसीसीचे 'C' प्रमाणपत्र आहे, त्यांना अर्ज करता येणार आहे. मात्र, उमेदवाराकडे 50% गुणांसह पदवी असणं आवश्यक आहे.

NCC सेवा - किमान दोन/तीन वर्षे NCC च्या वरिष्ठ विभागात/विंगमध्ये काम करण्याचा अनुभव आवश्यक आहे.

ग्रेडिंग - NCC च्या 'C' प्रमाणपत्र परीक्षेत किमान 'B' ग्रेड मिळालेला असावा. मात्र, ज्यांच्याकडे एनसीसीचे 'सी' प्रमाणपत्र नाही, ते या कोर्ससाठी अर्ज करण्यास पात्र नसतील.

वयोमर्यादा : पात्र अर्जदारांची वयोमर्यादा 1 जानेवारी 2021 रोजी किमान 19 वर्षे आणि कमाल 25 वर्षे आहे.

वेतनमान (Pay Scale)

  • लेफ्टनंट - लेव्हल 10, 56,100 ते 1,77,500 रुपये

  • कॅप्टन - लेव्हल 10B, 61,300 ते 1,93,900 रुपये

  • मेजर - लेव्हल 11, 69,400 ते 2,07,200 रुपये

  • लेफ्टनंट कर्नल - लेव्हल 12 ए, 1,21,200 ते 2,12,400 रुपये

  • कर्नल - लेव्हल 13, 1,30,600 ते 2,15,900 रुपये

  • ब्रिगेडियर - लेव्हल 13 ए, 1,39,600 ते 2,17,600 रुपये

  • मेजर जनरल - लेव्हल 14, 1,44,200 ते 2,18,200 रुपये

  • लेफ्टनंट जनरल एचएजी - स्केल लेव्हल 15, 1,82,200 ते 2,24,100 रुपये

  • लेफ्टनंट जनरल एचएजी+स्केल 16, 2,05,400 ते 2,24,400 रुपये

  • व्हीसीओएएस/आर्मी कमांडर/लेफ्टनंट जनरल (एनएफएसजी) - स्केल 17, 2,25,000 (निश्चित), सीओएएस स्केल 18, 2,50,000 रुपये

  • सैन्य सेवा वेतन (एमएसपी) - लेफ्टनंट ते ब्रिगेडियर पर्यंतच्या अधिकाऱ्यांना 15,500 रुपये

  • सेवा अकादमीमधील प्रशिक्षणाच्या संपूर्ण कालावधीदरम्यान अर्थात ओटीएमध्ये प्रशिक्षणाच्या कालावधीत पुरुष किंवा महिला कॅडेट्सना प्रशिक्षण शिष्यवृत्ती मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()