Hsc Exam Answer Paper : कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचा बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार कायम

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने टाकलेला बहिष्कार परीक्षेच्या दुसऱ्या दिवशीही कायम होता.
HSC Exam 2024
HSC Exam 2024esakal
Updated on

पुणे - बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने टाकलेला बहिष्कार परीक्षेच्या दुसऱ्या दिवशीही कायम होता. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण असणारी मुख्य नियामकांची बैठक होऊ शकलेली नाही.

बारावीच्या परीक्षेतील पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता. या विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेतील मुख्य नियामकांची बैठक बुधवारी झाली नव्हती. तर गुरुवारी हिंदी विषयाच्या मुख्य नियामकांची बैठक देखील शिक्षकांच्या बहिष्कारामुळे होऊ शकली नाही.

राज्यांमध्ये सहा ठिकाणी इंग्रजी विषयाच्या नियामकांच्या आयोजित केलेल्या बैठकीसुद्धा बहिष्कारामुळे होऊ शकल्या नाहीत, असे महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी स्पष्ट केले. तसेच, शुक्रवारी मराठी विषयाच्या मुख्य नियामकांची नियोजित बैठक सुद्धा शिक्षकांच्या बहिष्कार आंदोलनामुळे होऊ शकणार नाही, असेही प्रा. आंधळकर यांनी स्पष्ट केले.

कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने कोणत्याही अनुकूल हालचाली न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असे महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. सुनील पूर्णपात्रे यांनी सांगितले. तर, राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या प्रमुखांची तातडीची ऑनलाईन बैठक शुक्रवारी आयोजित केल्याची माहिती महासंघाचे सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे यांनी दिली.  

‘कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गप्प न बसता तातडीने शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात,’ असे आवाहन महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनाही बहिष्कारात सहभागी

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या सूचनेप्रमाणे बारावी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कारात सहभागी झाल्याचे निवेदन पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाच्या अध्यक्ष मंजूषा मिसकर, सचिव औदुंबर उकिरडे आणि सहाय्यक सचिव मीनाक्षी राऊत यांना देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण रोडे, उपाध्यक्ष प्रा. बी. आर. घोडके, कार्याध्यक्ष डॉ. तुकाराम साळुंखे, प्रा. सुंदर लोंढे, प्रा. पृथ्वीराज जाधव, प्रा. गंगाधर घाटगे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.