करिअर घडविताना : कंपनी सेक्रेटरी

कंपनी सेक्रेटरी (CS) म्हणजेच कंपनी सचिव हा व्यवसायाचा मुख्य घटक आहे.
Career
CareerSakal
Updated on

- के. रवींद्र

कंपनी सेक्रेटरी (CS) म्हणजेच कंपनी सचिव हा व्यवसायाचा मुख्य घटक आहे. कंपनीचा कायदेशीर तज्ज्ञ, धोरणात्मक नियोजन करणे, नियामक आणि वैधानिक जबाबदाऱ्यांचे पालन करून सर्व कॉर्पोरेट नियमांचे पालन सुनिश्चित करणे, कॉर्पोरेट कायदा, वित्त, व्यवस्थापन, इक्विटी आणि कंपनी सचिवीय कर्तव्ये पार करणाऱ्या विविध प्रकारच्या क्षमता असतात.

त्याचबरोबर कार्यालयीन कार्यपद्धती सुव्यवस्थित करणे आणि कंपनीचे कर परतावे, ऑडिट आणि आर्थिक माहिती यासारख्या कायदेशीर बाबींवर लक्ष ठेवण्याचे काम कंपनी सेक्रेटरी करत असतो. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) या संस्थे अंतर्गत कंपनी सेक्रेटरीची पदवी प्रदान केली जाते. या संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या सीए प्रोग्रॅममध्ये तीन स्तरांचा समावेश आहे.

१) फाउंडेशन प्रोग्रॅम -

(याजागी आता सीएस एक्झिक्युटिव्ह प्रवेश परीक्षा

(सीएसईईटी) आहे.)

२) एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम

३) प्रोफेशनल प्रोग्रॅम

फाउंडेशन प्रोग्रॅम (सीएसईईटी)

पात्रता निकष - उच्च माध्यमिक किंवा समतुल्य १०+२ परीक्षा उत्तीर्ण किंवा परीक्षेला बसलेले विद्यार्थी पात्र आहेत.

सर्व पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर जे आतापर्यंत थेट नोंदणीसाठी पात्र होते एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅमसाठी पात्र होण्यासाठी सीएसईईटी उत्तीर्ण होणे देखील आवश्यक आहे.

अर्ज करण्याची व परीक्षा पद्धत - ऑनलाइन पद्धतीने

परीक्षेचा कालावधी - २ तास १५ मिनिटे (चाचणीचा कालावधी १२० मिनिटे असेल आणि प्रेझेंटेशन आणि तोंडी परीक्षा १५ मिनिटांचे कम्युनिकेशन कौशल्यावर आधारित असेल)

परीक्षा स्वरूप - वस्तुनिष्ठ प्रकार

गुणदान पद्धत - १ गुण किंवा अधिक गुण बरोबरच्या उत्तरासाठी ऑनलाइन व तोंडी परीक्षेचे ३० गुणांपैकी गुण अंतिम गुणांकनामध्ये ग्राह्य धरले जातील. एकूण २०० गुणांपैकी चाचणी (CBT आणि Viva-Voce).

उमेदवाराला एकूण गुण ५० टक्का मिळायला पाहिजे व प्रत्येक पेपरमध्ये किमान ४०% गुण अनिवार्य आहे.

जुलै २०२३ सत्रासाठी १५ जून २०२३ पर्यंत CSEET नोंदणी सुरू आहे. CSEET परीक्षा ८ जुलै २०२३ रोजी आयोजित केली जाईल.

एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम

पात्रता व निकष - सीएस एक्झिक्युटिव्ह कोर्ससाठी नोंदणी करण्यासाठी, उमेदवारांचे वय १७ वर्षांपेक्षा जास्त असावे.

उमेदवारांनी सीए फाउंडेशन स्तरावर किंवा आयसीएसआयद्वारे आयोजित सीएसईईटी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावे.

ज्या उमेदवारांनी आयसीएमएआय किंवा आयसीएआयचा अंतिम स्तर उत्तीर्ण केला आहे ते देखील नोंदणी करण्यास पात्र आहेत.

महत्त्वाच्या लिंक -

१) https://www.icsi.edu

२) https://vidyarthimitra.org/news

(लेखक विद्यार्थी मित्र

www.VidyarthiMitra.org चे संस्थापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.