करिअर घडविताना : पदवी व पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विविध प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.
Admissions
Admissionssakal
Updated on

- के. रवींद्र

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विविध प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम एमबीए/एमएमएस, एमसीए, एमई/एमटेक, एम. आर्किटेक्चर, एमएचसीटी, एम.फार्मसी/फार्म डी (पदवीधर), एम.प्लॅनिंग, एमसीए द्वितीय वर्ष (लॅटरल एंट्री), तर पदवी बीई/बीटेक, बी.फार्मसी/फार्म डी., बी.आर्किटेक्चर, बी.एच.एम.सी.टी, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (DSE), डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी (DSP), बी. प्लॅनिंग, बी.डिझाइन, ‘एचएमसीटी’मध्ये थेट द्वितीय वर्ष पदवी, बी.फार्मसी याबाबत अभ्यासक्रमांची पात्रता व प्रवेश अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदतीची माहिती घेऊया.

मॅनेजमेंट प्रवेश (एमबीए/एमएमएस)

पात्रता

कोणत्याही शाखेतून किमान ५० टक्के सर्वसाधारण प्रवर्गाकरिता व इतरांसाठी ४५ टक्क्यांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.

एमएएच एमबीए/एमएमएस-सीईटी-२०२३ मध्ये नॉन झिरो स्कोअर मिळविणे आवश्यक आहे.

ऑल इंडिया उमेदवारांकरिता कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT) किंवा अॅप्टिट्यूड टेस्ट (CMAT), किंवा झेव्हीयर अॅप्टिट्यूड टेस्ट झेव्हीयर स्कूल ऑफ मॅनेजमेंट, जमशेदपूर (XAT) किंवा असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स (ATMA) किंवा मॅनेजमेंट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट किंवा इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (MAT) किंवा ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट (GMAT).

कोर्स नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी

मॅनेजमेंट प्रवेश १९ जुलै २०२३ सायंकाळी ५

(एमबीए/एमएमएस) वाजेपर्यंत

एमई/एमटेक

पात्रता

1) इंजिनिअरिंगच्या शाखेतून किमान ५० टक्के सर्वसाधारण प्रवर्गाकरिता व इतरांसाठी ४५ टक्क्यांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.

2) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीद्वारे आयोजित अभियांत्रिकी (GATE)मधील ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्टमध्ये पात्र गुण प्राप्त केलेले असावे.

कोर्स नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी

एमई/एमटेक १९ जुलै २०२३ सायं. ५ वाजेपर्यंत

बी.फार्मसी आणि पोस्ट ग्रॅज्युएट फार्म.डी प्रवेश

पात्रता

1) मान्यताप्राप्त संस्थेतून बारावीमध्ये फिजिक्स व मॅथेमॅटिक्स (अनिवार्य) व केमिस्ट्री किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोलॉजी विषयांसह सर्वसाधारण प्रवर्गाकरिता किमान ४५ टक्के व इतरांसाठी ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

2) बारावीनंतर एमएचटी-सीईटी किंवा एनईईटी (नीट)मध्ये नॉन झिरो पॉझिटिव्ह स्कोअर असणे आवश्यक आहे.

कोर्स नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी

बी.फार्मसी आणि २० जुलै २०२३ सायंकाळी ५

पोस्ट ग्रॅज्युएट फार्म.डी वाजेपर्यंत

डायरेक्ट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश

पात्रता

1) मान्यताप्राप्त तंत्रनिकेतन संस्थेतून अभियांत्रिकी डिप्लोमामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाकरिता किमान ४५ टक्के व इतरांसाठी ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

2) बी.एसस्सी सर्वसाधारण प्रवर्गाकरिता किमान ४५ टक्के व इतरांसाठी ४० टक्के व बारावीमध्ये गणित विषयासह युजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.

कोर्स नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी

डायरेक्ट द्वितीय वर्ष २२ जुलै २०२३ सायंकाळी ५

अभियांत्रिकी वाजेपर्यंत

डायरेक्ट द्वितीय वर्ष फार्मसी प्रवेश

पात्रता

1) मान्यताप्राप्त तंत्रनिकेतन संस्थेतून फार्मसी डिप्लोमामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाकरिता किमान ४५ टक्के व इतरांसाठी ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

कोर्स नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी

डायरेक्ट द्वितीय वर्ष फार्मसी २१ जुलै २०२३ सायं. ५ वाजेपर्यंत

महत्त्वाच्या लिंक -

1) https://cetcell.mahacet.org

2) https://vidyarthimitra.org/news

(लेखक विद्यार्थी मित्र www.VidyarthiMitra.orgचे संस्थापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()