‘गोखले इन्स्टिट्यूट’ची प्रवेश परीक्षा

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे अंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर विशेष अभ्यासक्रम उपलब्ध आहे
Exam
Exam esakal
Updated on
Summary

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे अंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर विशेष अभ्यासक्रम उपलब्ध आहे

- के. रवींद्र

भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. कर किंवा कर्जाचे व्याजदर, किंवा रोज लागणाऱ्या वस्तू यांच्या किमती, कच्चा माल, कृषी, आयात निर्यात, वित्तीय संस्था इ. बाबींचा सामान्य माणसांवर होणारा परिणाम व त्यांच्या योग्य समतोल राखण्यासाठी अर्थशास्त्रज्ञांचा मोलाचा वाटा आहे.

याक्षेत्रात करिअर करण्यासाठी अर्थशास्त्राचे योग्यज्ञान असणे आवश्यक आहे. याकरिता बारावीनंतर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे अंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर विशेष अभ्यासक्रम उपलब्ध आहे, येथे प्रवेश मिळविण्याकरिता प्रवेश परीक्षा आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे ः

कोर्सेस

बी.एस्सी.(अर्थशास्त्र), एम ए.(अर्थशास्त्र), एम.एस्सी.(अर्थशास्त्र), एम.एस्सी.(फायनान्शियल इकॉनॉमिक्स), एम.एस्सी.(कृषी व्यवसाय अर्थशास्त्र), एम.एस्सी.(आंतरराष्ट्रीय व्यवसाय अर्थशास्त्र आणि वित्त), एम.एस्सी (लोकसंख्या अभ्यास आणि आरोग्य अर्थशास्त्र), एम.एस्सी.(सार्वजनिक धोरण)

  • अर्ज मुदत : २५ मे २०२३ पर्यंत.

  • पहिल्या परीक्षेची तारीख : ११ जून २०२३

  • दुसरी परीक्षा तारीख : २५ जून २०२३

  • परीक्षा पद्धती : ऑनलाइन सीबीटीमोड.

  • परीक्षा शुल्क : बी.एस्सी.(अर्थशास्त्र) कोर्स १९५० रु.

-एम.एस्सी.(अर्थशास्त्र) कोर्स : १३०० रुपये (SC/ST साठी ६५० रुपये)

-एमएससी. कोर्स (सामान्य प्रवेश परीक्षा) १९५० रुपये.

पात्रता

पदवीसाठी

इयत्ता बारावीबोर्ड परीक्षा किंवा समतुल्य परीक्षेमध्ये एकूण किमान ६० टक्के गुण (SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५० टक्के गुण).

पदव्युत्तर

  • एमए (अर्थशास्त्र) कार्यक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना किमान ५० टक्के गुण मिळाले पाहिजेत.

  • पदवी स्तरावर एकूण (SC/ST राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के).

  • जे उमेदवार २०२२-२३ मध्ये बारावीच्या किंवा पदवी परीक्षेला बसले आहेत आणि ज्यांचे निकाल प्रलंबित आहेत ते देखील अर्ज करण्यास पात्र असतील. मात्र, त्यांचे निकाल उमेदवारांनी किंवा संबंधित महाविद्यालयांनी संस्थेला शक्यतो ३१ जुलै २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी ई-मेलद्वारे (acadbsc@gipe.ac.in) कळवले पाहिजेत.

परीक्षेचे स्वरूप

१) बी.एस्सी.(अर्थशास्त्र)

एकूण प्रश्न : १०० MCQ आणि एकूण गुण ः १००

गुणांचे विभाजन

  • विभाग १ ः गणित (४० गुण)

  • विभाग २ ः लॉजिकल रिझनिंग (४० गुण)

  • विभाग ३ ः इंग्रजी (२० गुण)

२) एम ए. (अर्थशास्त्र) कोर्स

एकूण प्रश्न ः १०० MCQ व एकूण गुण ः १००

गुणांचे विभाजन ः

  • विभाग १ ः गणित आणि सांख्यिकीमध्ये योग्यता (३० गुण)

  • विभाग २ ः विश्लेषणात्मक क्षमता आणि रिझनिंग (२० गुण)

  • विभाग ३ ः अर्थशास्त्रातील पदवी स्तरावरील ज्ञान (५० गुण)

३) एम.एस्सी. (अर्थशास्त्र)(आर्थिक अर्थशास्त्र)

एम.एस्सी. (आंतरराष्ट्रीय व्यवसाय अर्थशास्त्र आणि वित्त); एम.एस्सी.(कृषी व्यवसाय अर्थशास्त्र); आणि एम.एस्सी.(लोकसंख्या अभ्यास आणि आरोग्य अर्थशास्त्र)

एकूण प्रश्न ः १०० MCQ एकूण गुण ः १००

गुणांचे विभाजन

  • विभाग १ ः गणित आणि सांख्यिकीमध्ये योग्यता (३० गुण)

  • विभाग २ ः विश्लेषणात्मक क्षमता आणि रिझनिंग (२० गुण)

  • विभाग ३ ः अर्थशास्त्रातील पदवी स्तरावरील ज्ञान (५० गुण)

उमेदवार उपलब्धतेनुसार कोणत्याही एका तारखेची व सोयीनुसार परिक्षाकेंद्राची निवड करू शकता. परीक्षेचे हॉल तिकीट प्रवेश परीक्षेच्या १० दिवस आधी उपलब्ध होईल.

महत्त्वाच्या लिंक ः https://gipe.ac.in/admission-msc

लेखक विद्यार्थी मित्र www.VidyarthiMitra.org या वेबसाइटचे संस्थापक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.