करिअर घडविताना : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

जेएनव्हीएसटीची स्थापना ग्रामीण विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता ओळखण्याच्या आणि त्यांचे संगोपन करण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे.
Entrance Exam
Entrance Examsakal
Updated on

- के. रवींद्र

ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (जेएनव्हीएसटी) ही प्रवेश परीक्षा जवाहर नवोदय विद्यालयांकडून घेतली जाते. ती या निवासी शाळांचे प्रवेशद्वार म्हणून काम करत आहे.

जेएनव्हीएसटीची स्थापना ग्रामीण विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता ओळखण्याच्या आणि त्यांचे संगोपन करण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे. त्याचे प्राथमिक उद्दिष्ट देशभरातील जवाहर नवोदय विद्यालयांच्या प्रवेशासाठी इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांची निवड करणे आहे. परीक्षा हे होतकरू विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचे एक साधन आहे. शहरी-ग्रामीण शैक्षणिक भेद दूर करणे आणि उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांना समान संधी देण्याचा हा प्रयत्न आहे.

प्रवेश दिनांक

इयत्ता सहावी - शनिवार, २० जानेवारी २०२४

इयत्ता नववी - शनिवार, १० फेब्रुवारी २०२४

इयत्ता अकरावी - शनिवार, १० फेब्रुवारी २०२४

सहावीसाठी पात्रता

जवाहर नवोदय विद्यालय असलेल्या जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारच प्रवेशासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. सहावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार १० ते १२ वयोगटातील असावा. हाच नियम अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींमधील (एसटी) उमेदवारांसह सर्वांना लागू होतो. इयत्ता सहावीला प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार सरकारी/अनुदानित/मान्यताप्राप्त शाळेतून तिसरी, चौथी आणि पाचवीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.

इयत्ता सहावीचा पेपर पॅटर्न

विषय - प्रश्नांची संख्या - गुण - वेळ

मानसिक क्षमता - ४० - ५० - ६० मिनिटे

अंकगणित - २० - २५ - ३० मिनिटे

भाषा - २० - २५ - ३० मिनिटे

एकूण - ८० - १०० - २ तास

नववीसाठी पात्रता

नवोदय विद्यालयाचे रहिवासी आणि इयत्ता आठवीचा अभ्यास करत असलेले उमेदवारच नववीच्या प्रवेशासाठी पात्र आहेत. जिल्ह्यातील मान्यताप्राप्त शाळा जेथे जवाहर नवोदय विद्यालय कार्यरत आहे आणि जेथे प्रवेश मागितला आहे, ते पात्र आहेत. प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार प्रवेशाच्या वर्षाच्या १ मे रोजी १३-१५ वर्षे वयोगटातील असावा. हा नियम सर्व वर्गातील उमेदवारांना लागू आहे. परीक्षेसाठी भाषेचे माध्यम इंग्रजी/हिंदी आहे.

नववीचा पेपर पॅटर्न

विषय - गुण

इंग्रजी - १५

हिंदी - १५

गणित - ३५

विज्ञान - ३५

एकूण गुण - १००

एकूण वेळ - २.५ तास

अकरावीसाठी पात्रता

उमेदवाराने सीबीएसई किंवा इतर कोणत्याही राज्य शिक्षण मंडळाशी/इतर सरकार मान्यताप्राप्त मंडळाशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त शाळेतून दहावीचे शिक्षण घेतलेले असावे. भारतातून दहावीचे शिक्षण घेतलेले भारतीय नागरिकच अर्ज करण्यास पात्र आहेत. निवड चाचणी सकाळी ११ ते दुपारी दीडपर्यंत अशी एकूण अडीच तासांची असेल. त्यात वस्तुनिष्ठ प्रश्नांचे ५ विभाग असतील. १०० गुणांसाठी एकूण १०० प्रश्न असतील.

विषय - प्रश्नांची संख्या - गुण - वेळ

मानसिक क्षमता - २० - २० - ३० मिनिटे

इंग्रजी - २० - २० - ३० मिनिटे

विज्ञान - २० - २० - ३० मिनिटे

सोशल सायन्स - २० - २० - ३० मिनिटे

गणित - २० - २० - ३० मिनिटे

एकूण - १०० - १०० - २ तास ३० मिनिटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.