Board Exams : पाचवी, आठवी, नववीची बोर्ड परीक्षा यावर्षी नाही; शिक्षण विभागाचे महत्त्वाचे संकेत

सर्व वर्गांसाठी मूल्यमापन पद्धत पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्याचे संकेत राज्याच्या शिक्षण विभागाने (Education Department) दिले आहेत.
Karnataka Education Department
Karnataka Education Departmentesakal
Updated on
Summary

शालेय दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी २०२४-२५ मध्ये पाठ्यपुस्तके भाग- १ आणि भाग- २ म्हणून स्वतंत्रपणे छापण्यात आली आहेत.

बंगळूर : राज्य अभ्यासक्रमाच्या शाळांमधील पाचवी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी सार्वजनिक बोर्ड परीक्षा (Board Exam) घेतली जाणार नाही. या वर्गांचे बोर्ड परीक्षेचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने २०२४-२५ मध्ये सर्व वर्गांसाठी मूल्यमापन पद्धत पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्याचे संकेत राज्याच्या शिक्षण विभागाने (Education Department) दिले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये कर्नाटक राज्य अभ्यासक्रमाच्या पहिली ते दहावीच्या शाळांसाठी २०२४-२५ या वर्षाचा वार्षिक कृती आराखडा आणि शैक्षणिक मार्गदर्शक जारी करण्यात आले आहे. त्या आधारे शाळांमधील अभ्यासक्रम साहित्याचे अध्यापन व मूल्यमापन याबाबत करावयाच्या उपाययोजना सुचविल्या असून त्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.

Karnataka Education Department
Thane Tourism : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! ठाणे जिल्ह्यातील 'या' पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी, तहसीलदारांचा आदेश जारी

गेल्या २९ मे रोजी राज्यातील शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०२२-२३ लर्निंग रिकव्हरी उपक्रम आणि २०२३-२४ लर्निंग स्ट्रेंथनिंग कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची पुस्तके आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन सेल तयार केले जात आहेत आणि शिकण्यासाठी दरी भरून काढण्यासाठी अध्यापन, अध्ययन प्रक्रियेत लागू केले जात आहेत. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना पुढील वर्गासाठी तयार करण्यासाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जून महिन्यात सेतूबंध हा कार्यक्रम घेण्यात येईल.

इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे सेतूबंध साहित्य तयार करून ‘डीएसइआरटी’ वेबसाईटवर अपलोड केले आहे. सेतूबंध परिपत्रकाद्वारे कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. शालेय दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी २०२४-२५ मध्ये पाठ्यपुस्तके भाग- १ आणि भाग- २ म्हणून स्वतंत्रपणे छापण्यात आली आहेत.

भाग-१ मजकुराचा ५० टक्के आणि भाग दोन मजकुराचा ५० टक्के, असा एकूण शंभर टक्के मजकूर मूल्यमापनासाठी देण्यात आला असून त्यानुसार कार्यवाही केली जाईल. संदर्भ परिपत्रक आणि वर्ष २०२४-२५ साठी शैक्षणिक मार्गदर्शकाच्या आधारावर वार्षिक धडे सामायिक केले जातील. शिकण्याची सोय आणि माहिती प्रदान केली जाईल. ज्यामुळे फॉर्मेटिव्ह आणि सेमिटिव्ह असेसमेंट आयोजित केले जाईल. त्यानुसार शाळा स्तरावर विहित मुदतीत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पावले उचलली जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.