Marathi School : सरकारी मराठी शाळा बंद करण्याचा घाट; कर्नाटक सरकारकडून बेळगावमधील मराठी भाषा पुसण्याचा प्रयत्न

शहरातील अनेक कन्नड शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अतिशय कमी प्रमाणात आहे.
Marathi Schools in Belgaum
Marathi Schools in Belgaumesakal
Updated on
Summary

बेळगाव शहरातील मराठी शाळांना (Belgaum Marathi School) अनेक वर्षांचा इतिहास असून या भागातील अनेक सरकारी शाळा स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या आहेत.

बेळगाव : विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे कारण देत शहापूर परिसरातील सरकारी तीन मराठी शाळा बंद करण्याचा घाट शिक्षण खात्याने घातला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील मराठी शाळांवर (Marathi School) कर्नाटक सरकारची (Karnataka Government) वक्रदृष्टी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मराठी भाषकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

Marathi Schools in Belgaum
Jhadani Case : झाडाणीतील तब्बल 620 एकर जमीन गुजरातच्या GST आयुक्तांकडून खरेदी; 'त्या' नोटीसधारकांचे वकीलपत्र रद्द

बेळगाव शहरातील मराठी शाळांना (Belgaum Marathi School) अनेक वर्षांचा इतिहास असून या भागातील अनेक सरकारी शाळा स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या आहेत. मात्र, नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अतिशय कमी असल्याचे कारण देत बिच्छू गल्ली येथील मराठी शाळा बंद केली आहे, तर आनंदवाडी येथील शाळा गोवावेस येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक २५ मध्ये स्थलांतरित करण्याचा आदेश दिला होता.

याला शाळा सुधारणा कमिटी व पालकांनी विरोध दर्शविला तरी विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे कारण देत शाळा बंद करण्यात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी बसवाण गल्ली येथील शाळेला भेट देऊन शाळा बंद करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालेल्या काही दिवसांतच अनेक वर्षांचा इतिहास लाभलेल्या मराठी शाळा बंद करण्याचा आदेश बजावण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

शहरातील अनेक कन्नड शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अतिशय कमी प्रमाणात आहे. मात्र, कन्नड शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत कधीही विचार केला जात नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून बेळगाव शहरातील मराठी पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटकी सरकारकडून जाणीवपूर्वक सुरू आहे. त्यातूनच मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घातला जात आहे.

Marathi Schools in Belgaum
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होताच सरकारनं घेतली महत्त्वाची भूमिका; CM शिंदे म्हणाले, 'हा प्रकल्प जनतेवर थोपविणार...'

त्याबाबत जाब विचारणे गरजेचे बनले आहे; अन्यथा दरवर्षी शहरातील मराठी शाळा कमी होण्याची भीती आहे. अनेक वर्षांचा इतिहास लाभलेल्या मराठी शाळा बंद करण्याचा किंवा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक नागरिकांना किंवा पालकांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. तसेच याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारावा, अशी मागणी पालकातून होऊ लागली आहे.

विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे दाखवून मराठी शाळा बंद पडण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. शहापूर आणि परिसरातील तीन शाळा बंद केल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला जाईल. पुन्हा शाळा सुरू कराव्यात यासाठी आंदोलन करू.

-सागर पाटील, म. ए. समिती कार्यकर्ता

Marathi Schools in Belgaum
Almatti Dam : कोल्हापूर-सांगली पुराबाबत महत्त्वाची अपडेट! कृती समितीकडून आलमट्टी-हिप्‍परगी दौऱ्याचा अहवाल सादर

आनंदवाडी येथील शाळेचे काही महिन्यांसाठी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले आहे. नवीन इमारत उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा शाळा सुरू केली जाईल. बिच्छू गल्ली आणि बसवाण गल्ली येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यासाठी प्रयत्न करण्याची सूचना शिक्षकांना केली होती. मात्र, विद्यार्थी वाढलेले नाहीत. त्यामुळे एकाच ठिकाणी शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. मराठी किंवा कन्नड शाळा असा भेदभाव केला जात नाही.

-आय. जी. हिरेमठ, शहर, संपन्मूल अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com