कर्नाटक सरकार टिपू सुलतानचे धडे बदलणार

Tipu Sultan
Tipu Sultanesakal
Updated on
Summary

समितीनं टिपू सुलतानवरील धडे सुरू ठेवण्यास सांगितलंय; पण..

कर्नाटक सरकार (Karnataka Government) शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये (School Textbook) सुधारणा करणार असल्याचं कळतंय. या प्रक्रियेत 18 व्या शतकातील शासक टिपू सुलतानचा (Tipu Sultan) 'गौरव' करणाऱ्या अध्यायांवर अधिक लक्ष दिलं जाणार असल्याचं वृत्त आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय. विशेष म्हणजे, हिजाब वाद (Hijab controversy) आणि हिंदू मंदिरांमध्ये मुस्लिम व्यापार्‍यांवर बंदी यावरून सरकारला आधीच टीकेला सामोरं जावं लागतंय. आता शिक्षणाशी संबंधित आणखी एका मुद्द्यावरून सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आलंय.

कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बीसी नागेश (Education Minister BC Nagesh) म्हणाले, समितीनं राज्य पुस्तकांमध्ये विशेषतः टिपू सुलतानशी संबंधित असलेल्या पुस्तकांमध्ये सुधारणा करण्याची शिफारस केलीय. समितीचा अहवाल मला नुकताच मिळालाय. दरम्यान, चर्चेनंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होईल. परंतु, यावेळी त्यांनी प्रक्रियेशी संबंधित फारशी माहिती दिली नाहीय. नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, अहवालात 18 व्या शतकातील शासक टिपू सुलतानवरील इतिहासाचे धडे बदलण्याचा प्रस्ताव आहे.

Tipu Sultan
'आप'च्या आमदारानं शब्द पाळला; एक रुपया पगार घेणार, पेन्शनही सोडली

अधिकाऱ्यानं पुढं सांगितलं की, समितीनं टिपू सुलतानवरील धडे सुरू ठेवण्यास सांगितलंय. तर, टिपू सुलतानचा गौरव करणारा भाग काढून टाकण्याची सूचना केलीय. मात्र, कोणते भाग काढले जाणार हे अद्याप कळू शकलेलं नाहीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.