कर्त्या-करवित्या महिलांचा गौरवग्रंथ

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना ‘बाया कर्वे’ पुरस्कार देण्यात येतो. अत्यंत मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार प्राप्त झालेल्या निवडक १५ महिलांच्या कार्याची ओळख करून देणारे पुस्तक म्हणजे ‘कर्त्या करवित्या’.
कर्त्या-करवित्या महिलांचा गौरवग्रंथ
Updated on

प्रेरणा

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना ‘बाया कर्वे’ पुरस्कार देण्यात येतो. अत्यंत मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार प्राप्त झालेल्या निवडक १५ महिलांच्या कार्याची ओळख करून देणारे पुस्तक म्हणजे ‘कर्त्या करवित्या’. समाजाच्या उन्नतीचा ध्यास घेतलेल्या या कर्त्या स्रियांनी उपसलेले अफाट कष्ट, प्रसंगी पत्करलेला रोष आणि तरीही मातृहृदयाने समाजासाठी केलेले कार्य या पुस्तकात वाचायला मिळते.

शारीरिक मर्यादांना झुगारून देत अनंत ध्येयासक्तीने भारलेल्या नसिमा हुरजूक, वनस्थळीच्या ऊर्जास्रोत असलेल्या निर्मला पुरंदरे, शिक्षणाच्या नव्या वाटा शोधून त्यावर नव्या पिढीला घेऊन जाणाऱ्या रेणू दांडेकर, ‘मूल तिथे शाळा’ ही अभिनव कल्पना सत्यात साकारणाऱ्या रजनी परांजपे यांसह एकूण १५ कर्तबगार स्त्रियांचे कार्य वाचताना थक्क व्हायला होते.

या प्रत्येकीची आर्थिक परिस्थिती भिन्न, कौटुंबिक पार्श्‍वभूमी वेगळी आणि कार्यक्षेत्रदेखील वेगवेगळे आहे, मात्र या सर्वांमध्ये एक साम्य आढळते आणि ते म्हणजे ‘मी आणि माझे’याच्या पलीकडे जाऊन समाजासाठी रचनात्मक काम करण्याची उत्कट इच्छाशक्ती आणि ही इच्छा प्रत्यक्षात साकारण्याची अफाट क्षमता. समाजाच्या उन्नतीसाठी मेहनत घेण्याची जिद्द आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारी सर्जनशील दृष्टी!

या पुस्तकात पुरस्कारप्राप्त महिलांच्या कार्याची ओळख करून देताना अतिशयोक्ती ठरणार नाही किंवा त्यांनी केलेल्या कार्याला चमत्कृतीचे स्वरूप प्राप्त होणार नाही याची काळजी घेतलेली जाणवते. या सर्व महिला काही अवतारी नाहीत, तरीही त्यांचे आपल्याहून वेगळेपण काय तर, विचारांच्या रुंदावलेल्या कक्षा, स्रीसुलभ सर्जनशीलतेला व्यापक स्वरूप देऊन ‘वसुधैव कुटुंबकम्’ या धारणेने सर्वांना आपलेसे मानून त्यांच्या उत्थानासाठी केलेले कार्य आणि स्वतःच्या सुखाचा त्याग करून समाजात सुखाची आणि आनंदाची पेरणी करण्यासाठी उपसलेले अफाट कष्ट. प्रत्येकाने हे पुस्तक वाचून त्यातून प्रेरणा घेणे आणि समाजासाठी काम करणाऱ्या या कर्त्या महिलांप्रती कृतज्ञ राहणे आवश्‍यक आहे.

(संकलन : रोहित वाळिंबे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.