दरवर्षी एसबीआय, आयबीपीएस, बँक ऑफ बडोदा यासारख्या बँक भरती संबंधित परीक्षेसाठी भारतभरातून लाखो उमेदवार परीक्षा देत असतात. परंतु त्यापैकी काही मोजकेच निवडले जातात. याचे मुख्य कारण म्हणजे बँक परीक्षा आणि या क्षेत्रातील स्पर्धा हे आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात फक्त त्याच विद्यार्थ्यांना यश मिळते, जे ठोस प्लॅनिंग, स्ट्रटेजी तयार करुन तयारी करतात आणि परीक्षेच्या वेळी ते प्लॅनिंग पाळतात देखील. आज आपण बँकिंगच्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारचे ठोस धोरण आखले पाहिजे हे जाणून घेणार आहोत.
अभ्यासक्रम, कटऑफ आणि काठिण्य पातळी
बँक परीक्षेशी संबंधित अनेक परीक्षा आहेत, परंतु प्रत्येकाचा अभ्यासक्रम एकसारखाच असतो. तेव्हा वेगवेगळ्या परीक्षेत कोणत्या विषयातून किती गुणांसाठी प्रश्न विचारले जातात आणि या प्रश्नांची पातळी काय आहे ते कळजीपुर्वक आभ्यासा. तसेच प्रत्येक विषयाचा कटऑफ आणि एकूणच कटऑफ तपासा. शेवटी या सगळ्या माहितीच्या आधारे आपण कोणती परीक्षा घ्यायची ते निवडावे आणि त्यानुसार धोरण ठरवणे फायद्याचे ठरेल.
प्रत्येक विषयाची तयारी वेगळी करा
तुम्ही कोणती परीक्षा देणार आहात हे निवडल्यानंतर त्या परीक्षेत कठीण स्तरांच्या आधारे विषय वेगळे करा. तुमच्या विषयांच्या दोन याद्या करा ज्यामध्ये एका यादीत, ज्या विषयांवर आपणास मजबूत पकड आहे ते आणि दुसर्या यादीत ज्यामध्ये आपण कमकुवत आहात ते विषय ठेवा. जोरदार पकड असलेल्या विषयांची तयारी आधी करा कारण की, अशा विषयांची तयारी करण्यासाठी कमी वेळ लागतो.
मॉक टेस्टचा सराव करा
भरपुर प्रश्नसंच सोडवा, या मॉक टेस्टचा सराव केल्याने तुमचा वेग आणि अचूकता वाढेल. सोबतच यामुळे तुम्हाला आपल्या तयारीमध्ये कमतरता आहे की नाही हे देखील तपासता येईल आणि सुधारणा करता येतील.
अवघड आवघड विषयांची तयारी
तुम्हाला अवघड वाटतात त्यातील काही विषय निवडा, ज्यात जास्त प्रश्न विचारले जातात आणि त्या विषयांचा सुरुवातीपासून आभ्यास करा. अचूकता वाढवण्यासाठी जास्त प्रॅक्टिस करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.