राष्ट्रीय डॉक्टर दिन दरवर्षी 1 जुलै रोजी हा डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. 1991 मध्ये भारतात प्रथमच राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला. दैनंदिन जीवनात मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यासाठी डॉक्टरांकडून अनेक सल्ले दिले जातात. कोरोना महामारीच्या काळात तर डॉक्टर आपल्यासाठी देवदूतच ठरले होते.
आपल्या देशात वैद्यकीय क्षेत्र हे करिअरच्या दृष्टीने सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधी तरुण या क्षेत्रात त्यांचे करिअर घडवण्यासाठी प्रवेश घेतात. यात अनेक पालकांचेही आपल्या मुलाने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करावे असे स्वप्न असते. कारण आपल्या देशात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. तसेच तुम्हाला देशसेवेसोबतच चांगला पगारही असतो आणि नावासोबतच तुम्हाला समाजात प्रसिद्धीही मिळवता येते.
तुम्हीसुद्धा सायन्समधून १२ वी उत्तीर्ण असाल, तुम्हालाही या क्षेत्रात पुढे करिअर करायचे असेल, तर बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही एमबीबीएस, बीडीएस, बीएस्सी नर्सिंग यांसह विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता.
दंत शल्यचिकित्सक प्रामुख्याने दातांची काळजी घेतात तसेच दात आणि जबड्याच्या हाडांचे विकार शस्त्रक्रियेद्वारे दूर करतात. या अभ्यासक्रमाचा कालावधीही 4 वर्षांचा आहे. कोर्स केल्यानंतर, विद्यार्थी दंत शल्यचिकित्सक म्हणून कोणत्याही रुग्णालयात काम करण्याव्यतिरिक्त स्वतःचे क्लिनिक सुरू करू शकतात.
होमिओपॅथिक औषध भारतात खूप लोकप्रिय असल्याने, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी BHMS कोर्स हा एक चांगला पर्याय आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधीही साडेपाच वर्षांचा असून अभ्यासाचा एकूण खर्च 4 लाख ते 10 लाखांपर्यंत आहे.
जर तुम्ही NEET परीक्षा पास करू शकला नाही तर B.Sc नर्सिंग हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो, यामध्ये तुम्ही नर्सिंग संबंधित अभ्यास करू शकता.
12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर हा सर्वात पसंतीचा अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी 5.5 वर्षे आहे. अभ्यासक्रमाची एकूण किंमत सुमारे 6 लाख ते 53 लाख आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश बहुतेक संस्थांमध्ये NEET UG प्रवेश परीक्षेद्वारे केला जातो.