सॅलरी निगोशिएशनसाठी काही महत्वाच्या टिप्स, मिळेल मनासारखा पगार

know some important tips for salary negotiation in new job Marathi Article
know some important tips for salary negotiation in new job Marathi Article
Updated on

पुणे : जेव्हा तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करायला ळागता त्यामागे सगळ्यात महत्वाचे कारण असते ते म्हणजे पगार, पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी जाता आणि इंटरव्ह्यू मध्ये पगाराबद्दल निगोशिएट करणे सुरु असते अशा वेळी बऱ्याच जणांना एचआरशी मोकळेपणाणे बोलण्यात आडचण वाटते. दरम्यान बऱ्याच चूका देखील आपण करतो, त्यामुळे तुम्हाला पुढे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शेवटी तुम्ही एचआर सांगेल त्या गोष्टीला होकार देऊन बसता. आज आपण इंटरव्ह्यू दरम्यान आपल्या पगाराविषयी बोलणी करताना कुठली काळजी घ्यायला हवी ते जाणून घेणार आहोत. 

व्यवस्थित रिसर्च करा

 जेव्हा आपण एखाद्या संस्थेत नोकरीच्या मुलाखतीसाठी जाता तेव्हा प्रथम त्या संस्थेबद्दल पुरेशी माहिती मिळवणे गरजेचे आहे. तुम्ही ज्या पदासाठी मुलाखत देणार आहात त्या पदासाठी कंपनी किती पगार देत आहे याची माहिती देखील तुम्हाला असायळा हवी. इतकेच नाही तर त्या कंपनीत तुमच्या कोणी ओळखीची व्यक्ती काम करत असेल तर तेथे असणारे सॅलरी स्ट्र्क्चर बद्दल माहिती करुन घ्या.
 

पगाराच्या ट्रेंडबद्दल जाणून घ्या 

तुम्ही ज्या प्रोफाइलसाठी नोकरीची मुलाखत देणार आहात त्या प्रोफाइलवर दुसर्‍या कंपनीला किती पगार दिला जात आहे याची माहिती देखील मिळवा. यामुळे आपल्याला हे कळेल की इतर कंपनी त्यांच्या कर्मचार्‍यांना या प्रोफाइलसाठी काय पगार देत आहे, तसेच तुम्हाला देण्यात येणार पगार कमी आहे की जास्त याची तुलना देखील करणे सोपे जाईल.

कंपनीची ऑफर काय आहे?

तुमची पगाराची अपेक्षा उघड करण्यापूर्वी कंपनीची ऑफर जाणून घ्या. यामुळे आपल्याला वाटाघाटी करताना बराच फायदा होईल. कारण जर तुम्ही तुमची अपेक्षा अगोदर सांगितली असेल तर कंपनी तुम्हाला त्यापेक्षा कमी ऑफर देईल आणि मग कंपनीचा एचआर तुम्हाला निगोशिएट करायला सांगेल.

पगारवाढ मागण्यापूर्वी...

सामान्यत: जेव्हा नोकरी स्विच केली जाते तेव्हा दुसरी नोकरी 20 ते 30 टक्के पगार वाढीने जॉईन केली जाते. परंतु जर तुम्हाला कंपनीकडून आणखी पगारवाढ अपेक्षित असेल तर त्यासाठी तुम्ही कंपनीच्या एचआरला तुमच्या कौशल्यांबद्दल पटवून द्यावे लागेल. मनासारखा पगार हवा असेल तर तुम्ही कंपनीसाठी कसे उपयुक्त आहात हे तुम्हाला एचआरला व्यवस्थित सांगावे लागेल. त्यासाठी तुमची संभाषन कौषल्या तेवढे चांगले असणे गरजेचे आहे. 

लगेच हो म्हणू नका 

एचआरचे ऑफर पत्र पाठविल्यानंतर तुम्ही ताबडतोब होकार देण्याची गरज नाही. आपल्या सीटीसीचे कंपनीच्या एचआरचे किती भाग केले आहेत ते आपण प्रथम पहावे. वास्तविक, एचआर केवळ पगारापासून मेडिकल, पीएफ  इतर रक्कम कपात केली जाते. म्हणूनच  फक्त सीटीसी पाहून आनंदी होऊ नका तर एकूण पगारावर लक्ष द्या. 

शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला त्या नोकरी कुठल्याही परिस्थितीमध्ये हवी असेल तर आणि तुम्हाला पगार देखील वाढवून हवा असेल तर एचआरशी बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा एक मेल टाईप करा. त्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेला पगाराविषयी लिहा. पगाराच्या अवास्तव अपेक्षा ठेऊ नका. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()