परीक्षा झाल्यानंतर पुढची तयारी कशी करावी? जाणून घ्या सविस्तर

know what to do after exams Marathi Article
know what to do after exams Marathi Article
Updated on

दहावी किंवा बारावीची परीक्षा असो किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, परीक्षेपर्यंत आपण तयारी करण्यात घालवतो. पण जेव्हा या परीक्षा संपतात, तेव्हा निकालाची वाट पाहत असतो. अशावेळी पुढे कोणत्या क्षेत्रात आणि काय करावे याचे विचार डोक्यात यायला लागतात. अगदी याच कालावधीत विद्यार्थ्यांना त्यांच्या करियरचे महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात.  हे निर्णय घेण्याआधी आपल्याला डोक्यात काही गोष्टी स्पष्ट असणे गरजेचे असते. आज आपण अशाच काही महत्वाच्या गोष्टीविषयी जाणून घेणार आहोत. 

तुमच्याकडे उबलब्ध साधने वापरा

आपल्या करियर निवडीबद्दल योग्य व्यक्तीशी चर्चा करा. आपले वडिल, आई, भावंड किंवा सल्लागारांशी बोला आणि तुमचे विचार त्यांच्यासमोर मांडा. ही सर्व लोक तुम्हाला य़ोग्य निर्णय घेण्यात मदत करु शकतात. समजा तुम्ही डॉक्टर बनण्याचा विचार केला असेल, परंतु आताही तुम्हाला खात्री नसल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या उपलब्ध व्यक्तींचा सल्ल्याने  निर्णय घेऊ शकता. आपल्या फॅमिली डॉक्टरांना विनंती करा आणि त्यांच्याबरोबर एक-दोन दिवस घालवा म्हणजे डॉक्टरांच्या आयुष्याबद्दल तुम्हाला चांगली कल्पना येईल. आपल्याला या प्रकारच्या कामात रस आहे का? हे लक्षात येईल. तसेचआपल्याला सीए किंवा एमबीए करायचे असल्यास आपले वडील, भाऊ किंवा कोणत्याही नातेवाईक,जे या क्षेत्रात आहेत किंवा त्यांची ओळख या क्षेत्रात आहे त्यांच्याबरोबर वेळ घालवा, जेणेकरून आपल्या भविष्याबद्दल खात्रीने निर्णय घेऊ शकाल. 

पैशापेक्षा आनंद शोधा

 तुम्हाला काहीतरी नवे, काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असेल तर त्या कल्पनेवर काम करा. एखाद्या  क्षेत्रात पैसा मिळतो म्हणून त्याची निवड करु नका. तुम्ही करत असलेल्या कामात आनंद वाटत असेल तर पैसा आपोआप कमवला जातो. आपल्या कल्पनेच्या मजबूत आणि कमकुवत दोन्ही बाजूंचा विचार करा आणि तुमची सर्व योजना लिहून काढा. त्यानंतर आपल्या  घरातील मोठ्यांना त्याबद्दल सांगा.

इंटर्नशिप करा

 इंटर्नशिपला हलक्यात घेऊ नका. तुम्ही कोणत्या क्षेत्रात  करियर करायते  आहे हे ठरविल्यास, शक्य तितक्या लवकर त्या क्षेत्रात काम करण्याची संधी शोधा . लवकर कामाला सुरुवात केल्याने तुम्हाला ते काम आवडले नाही तर कालांतराने तुम्ही इतर पर्यायांचा देखील वेळेत विचार करु शकता. जर आपल्या शाळा किंवा महाविद्यालयातून इंटर्नशिपची सुविधा उपलब्ध नसेल तर आपण स्वत: कंपन्यांशी संपर्क साधू शकता.

नवीन भाषा शिकून घ्या

हे आपल्याला पुढे मदत करेल. आपण आपल्या करियरबद्दल काही ठरवू शकत नसल्यास किंवा कोर्सच्या सुरूवातीस काही महिने शिल्लक असल्यास, आपल्या आवडीची नवीन भाषा शिका. मग, आपण कोणत्या क्षेत्रात करियर करणार आहात याचा काही फरक पडत नाही. नवी भाषा शिकणे तुम्हाला वयक्तिक वाढीस तसेस इतर ठिकाणी उपयुक्त ठरेल. याशिवाय त्यामुळे तुम्हाला आनंदही मिळेल. जर तुम्हाला कोर्स करण्यात पैसे घालवायचे नसतील तर आजकाल बरेच व्हिडिओ चॅनेल्स ऑनलाईन आहेत जे तुम्हाला भाषेची मूलभूत माहिती विनामूल्य देतात.


संयम ठेवा

जर तुम्ही तुमची सहा महिने वेळ कुठेतरी इंटर्नशिप करण्यात घालवला असेल आणि त्यानंतर तुम्हाला हे समजले असेल की हे फील्ड तुमच्यासाठी नाही, तर घाबरू नका आणि निराश होऊ नका. करियर बदलण्यास अद्याप उशीर झालेला नाही. आपली आवड ओळखा आणि त्यानुसार आपल्या आवडीचे करियर निवडा. तुम्हाला निर्णय घेण्यात आडचण येत असेल तर,  तुमच्या वडीलजनांशी किंवा विश्वासू लोकांशी बोला, करियर सल्लागारांना भेटा आणि आपली आवड समजून घ्या.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.