Shivaji University Kolhapur
Shivaji University Kolhapuresakal

Shivaji University : पावसामुळे स्थगित झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा कधी? प्रवेश प्रक्रियेचीही वाढविण्यात आली मुदत

Shivaji University Kolhapur : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात २१ जुलैपासून अतिवृष्टी सुरू झाली.
Published on
Summary

विद्यापीठातील अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयात विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ (Shivaji University Kolhapur) कार्यक्षेत्रातील अतिवृष्टीमुळे २२ जुलैपासून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा (Degree, Post Graduate Course Examination) स्थगित करण्यात आल्या. त्या परीक्षा गुरुवार (ता. १) पासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे. प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात २१ जुलैपासून अतिवृष्टी सुरू झाली. त्यामुळे वाहतुकीचे अनेक मार्ग बंद झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येणे अडचणीचे ठरत होते. ते लक्षात घेऊन विद्यापीठाने २२ जुलै आणि त्यानंतर पुढील सात दिवसांच्या परीक्षा स्थगित केल्या. आता पावसाने उघडीप दिल्याने पुराचे पाणी ओसरत आहे. त्याने वाहतुकीसाठी मार्ग खुले होऊ लागले आहेत.

Shivaji University Kolhapur
Kolhapur Flood : पंचगंगेची पाणी पातळी आणखी उतरली; राधानगरी, वारणा, आलमट्टी, कोयनेत किती साठा?

त्यामुळे विद्यापीठाने स्थगित केलेल्या परीक्षा गुरुवारपासून पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादिवशी लॉ (विधी, तीन आणि पाच वर्षे), एम. फार्मसी., बी. फार्मसी (दुसरे वर्ष), विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग बी. टेक. अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा होणार आहे. एम. एस्सी., केमिस्ट्री, बॉटनी, एमजेसी., बीजेसी, आदी विविध अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा देखील यादिवशी घेतली जाणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.

Shivaji University Kolhapur
Jyotiba Dongar : जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी आढळले दीड टनाचे प्राचीन दगडी पर्जन्यमापक यंत्र

दरम्यान, विद्यापीठातील अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयात विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे ती प्रक्रिया पूर्ण करणे अनेक विद्यार्थ्यांना शक्य झाले नाही. ते लक्षात घेवून विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्याचा निर्णय घ्यावा आणि त्याबाबत अधिविभागप्रमुख, प्राचार्यांना सूचना करावी, अशी मागणी व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे केली होती. त्यावर सकारात्मक कार्यवाही करत विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविली आहे. त्यात एमबीएसह अन्य अभ्यासक्रमांचा समावेश असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.