एलपीयूचा विद्यार्थी यासीर याला एका आयटी कंपनीत मिळाले 3 कोटींचे पॅकेज

एलपीयूच्या हुशार विद्यार्थ्यांना मिळाले सरासरी ₹12.3 लाखांचे पॅकेज
lpu
lpu
Updated on

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी दरवर्षी प्लेसमेंटच्या क्षेत्रात आपलेच आधीचे रेकॉर्ड मोडत आहे. यंदाच्या 2022-23 च्या LPU बॅचने प्लेसमेंट सीझनमध्ये विक्रमी यश प्राप्त केले. विद्यापीठातील 1100 हून अधिक विद्यार्थ्यांनी 10 लाख ते 64 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळवले. एलपीयूच्या १० टक्के विद्यार्थ्यांनी सरासरी 12.3 लाखाचे पॅकेज मिळवले. इतर आयआयटीच्या तुलनेत ही संख्या जास्त असन. कौशल्य विकासात आघाडीवर असलेले विद्यापीठ म्हणून LPU चे स्थान महत्त्वपूर्ण आहे.

2018 बॅचचा LPU विद्यार्थी यासिर एम याने IT कंपनीमध्ये 3 कोटी रुपयांचे पॅकेज मिळवले. तसेच पवन कुंचाला या विद्यार्थ्याला टीसी सेंट्रल या आयटी कंपनीकडून एक कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.

२०२३-२४ बॅचच्या विद्यार्थ्यांपैकी यशस्वी यदुवंशी आणि बीटेक कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंगच्या हर्ष वर्धन यांनी नुकतेच मायक्रोसॉफ्टमध्ये ५२.०८ लाख रुपयांचे दणदणीत पॅकेज मिळवले. याशिवाय 2022-23 बॅचच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने सर्वाधिक 54.9 लाख रुपये CTCचे पॅकेज मिळवले. दुसरीकडे, आर्किटेक्चर आणि एमबीएच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 31.69 आणि 29.3 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.

शेकडो LPU पदवीधर सध्या Microsoft, Apple, Google, Amazon आणि इतर अनेक नामांकित कंपन्यांमध्ये 1 कोटींहून अधिक पॅकेजेससह प्रतिष्ठित पदांवर कार्यरत आहेत. LPU विद्यार्थ्यांना Amazon, TCS, Bosch, Trident, Federal Bank, Bank of America, Flipkart, Cipla, LG Electronics, Qatar Highways, P&O Cruises, Torrent Pharmaceutical, IndiGo आणि इतर अनेक प्रतिष्ठित Fortune 500 कंपन्यांकडून 5500 हून अधिक प्लेसमेंट ऑफर मिळाल्या आहेत. या ऑफर्स विशेषत: अभियांत्रिकी व्यवस्थापन, हॉटेल आणि पर्यटन, वैद्यकीय, कृषी, सामाजिक विज्ञान इत्यादी क्षेत्रांशी संबंधित आहेत.

ज्या कंपन्या IITs, NITs आणि IIMs मधील विद्यार्थ्यांना भरती करतात त्यातल्या जवळपास 350 हून अधिक कंपन्या LPU मधूनसुद्धा विद्यार्थ्यांची निवड करतात.  LPU कायमच विविध उद्योगांतील अद्ययावत गोष्टी जाणून विद्यार्थ्यांना त्यात कुशल करण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यामुळेच येथे कॅम्पस भरतीमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असतो. या कंपन्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या तसेच उत्तम पॅकेजही ऑफर करतात.

LPU चे कुलपती आणि संसद सदस्य (राज्यसभा) डॉ. अशोक कुमार मित्तल म्हणाले की विद्यार्थ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी, प्रगतीसाठी आणि बौद्धिकल व आंतरवैयक्तिक वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी LPU नेहमीच वचनबद्ध आहे. विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात एलपीयूचा करिअर मार्गदर्शन विभाग खूप महत्त्वाची भूमिका निभावतो. LPU च्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाने जगभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वोत्तम स्थान प्राप्त केले आहे.

LPU मधील 2024 च्या बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.

LPU मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे. विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा “LPUNEST 2024” उत्तीर्ण व्हावी लागेल. काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी या परीक्षेनंतर मुलाखतही दयावी लागेल. परीक्षा आणि प्रवेशप्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थी https://bit.ly/3UDfOu0 ला भेट देऊ शकतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com