M. Phil इन क्लिनिकल सायकॉलॉजी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू

admission
admissionesakal
Updated on


नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे (MUHS) २०२१-२२ साठी एम.फिल. इन. क्लिनिकल सायकॉलॉजी (M.Phil. - Clinical Psychology) अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया (Admission) सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ७ जानेवारी २०२२ पर्यंत आहे.

नवी दिल्ली येथील भारतीय पुनर्वसन परिषदेने अभ्यासक्रमाला राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मान्यता दिली आहे. विद्यापीठाचे संलग्नित पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ससून रुग्णालय आवारात महाराष्ट्र मेंटल हेल्थमध्ये अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. एम. फिल. इन. क्लिनिकल सायकॉलॉजी अभ्यासक्रमास प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या संकेतस्थळावर अभ्यासक्रमाची माहिती उपलब्ध आहे. त्यासाठी अधिसूचना क्रमांक ४३/२०२१ पाहता येईल. याबाबत अधिक माहितीसाठी पालक, विद्यार्थी व अभ्यागतांना ०२५३-२५३९१९६ अथवा २५३९२०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

admission
SSC ने जारी केल्या CGL भरतीच्या अर्जदारांसाठी महत्त्वाच्या सूचना
admission
BHEL मध्ये इंजिनिअर, सुपरवायझर पदांची भरती! 70 हजारहून जास्त पगार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()