पुणे - विद्यार्थ्यांनो, तुम्ही दहावी-बारावीच्या परीक्षेची तयारी करत असाल, तर तुमचे अभ्यासाचे वेळापत्रक थोडेसे अलीकडे घेऊन ठेवा. होय, कारण राज्य मंडळाने यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेच्या नियोजित तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, दरवर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा आठ ते दहा दिवस अगोदरच सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणारी बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.