पुणे : राज्यात इयत्ता अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतंर्गत दोन लाख ९८ हजार ६६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रात एकूण ६३ हजार ९४८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. दरम्यान, पुण्यात ४५ विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक स्तरावर प्रवेशासाठी अर्ज केला आहे. आता या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडे पाठविण्यात येतील, त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
राज्यात पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, अमरावती, नागपूर, नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेतंर्गत राज्यातील एकूण एक हजार ४९८ महाविद्यालयातील चार लाख २९ हजार ७९४ जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली असून त्यातून दोन लाख ९८ हजार ६६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यामध्ये पुण्यातील ३१७ कनिष्ठ महाविद्यालयांतील ९७ हजार ८१३ जागा उपलब्ध होत्या. या जागांवर आतापर्यंत ६३ हजार ९४८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
दरम्यान, सध्या शिक्षण उपसंचालक स्तरावरून प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी आतापर्यंत ४५ विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश मिळावा, म्हणून अर्ज केला आहे. अकरावी प्रवेशाच्या नियोजित प्रक्रियेनुसार प्रवेशाची फेरी नोव्हेंबर अखेर संपली. परंतु, दरम्यान प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या प्रक्रियेसाठी शिक्षण संचालकांच्या परवानगी लागेल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. शिक्षण संचालकांची परवानगी मिळाल्यानंतर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.
केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतंर्गत झालेल्या प्रवेशाचा आढावा :
महापालिका क्षेत्र : महाविद्यालयांची संख्या : प्रवेश क्षमता : झालेले प्रवेश : रिक्त जागा
पुणे, पिंपरी-चिंचवड : ३१७ : ९७,८१३ : ६३,९४८ : ३३,८६५
अमरावती : ६५ : १३,२४२ : ८,५९७ : ४,६४५
मुंबई : ८३८ : २,४७,१८४ : १,८०,५५० : ६६,६३४
नागपूर : २१८ : ४९,३४० : २८,३७६ : २०,९६४
नाशिक : ६० : २२,२१५ : १७,१९५ : ५,०२०
एकूण : १,४९८ : ४,२९,७९४ : २,९८,६६६ : १,३१,१२८
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.