'म्हाडा' करणार विविध 565 पदांची भरती! जाणून घ्या नियम व अटी

'म्हाडा' करणार विविध 565 पदांची भरती! जाणून घ्या नियम व अटी
म्हाडा
म्हाडाGallery
Updated on
Summary

म्हाडामध्ये आता विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे.

सोलापूर : म्हाडामध्ये (Maharashtra Housing and Area Development Authority - MHADA) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. विविध संवर्गातील 565 रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 पासून ते 14 ऑक्‍टोबरपर्यंत रात्री 12 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. भरती प्रक्रिया विविध संवर्गातील एकूण 565 रिक्त पदांसाठी राबविण्यात येत आहेत.

म्हाडा
रेल्वेमध्ये 400 हून अधिक प्रशिक्षणार्थी पदांची होणार भरती!

म्हाडामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13 पदे, उपअभियंता (स्थापत्य) 13 पदे, मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी 2 पदे, सहायक अभियंता (स्थापत्य) 30 पदे, सहायक विधी सल्लागार 2 पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119 पदे, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक 6 पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 44 पदे, सहायक 18 पदे, वरिष्ठ लिपिक 73 पदे, कनिष्ठ लिपिक टंकलेखक 207 पदे, लघुटंकलेखक 20 पदे, भूमापक 11 पदे, अनुरेखकाच्या 7 पदांचा समावेश आहे.

रिक्त पदांचा सविस्तर तपशील https://mhada.gov.in या संकेतस्थळावर आहे. म्हाडा प्रशासनाने भरती प्रक्रियेसाठी कुणालाही प्रतिनिधी, सल्लागार व एजंट म्हणून नेमलेले नाही. भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही अशा व्यक्तींशी परस्पर व्यवहार करू नये तसेच त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.

जाणून घ्या निवडीचे निकष

  1. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन / लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्‍यक राहील. तसेच या निकषानुसार पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास निकष शिथिल करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांना राहतील.

  2. पदासाठी विहित केलेल्या अर्हता /अटी / शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची या परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे बनविलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांकडून विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल.

  3. एकाच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास 2 डिसेंबर 2017 राजीच्या शासन निर्णयाच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.

  4. समान गुण असल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील.

  5. समान गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त केलेले असतील तर त्यापैकी वयान ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

  6. वरील अनुक्रमांक 1 व 2 या दोन्ही अटींमध्ये समान ठरत असलेल्या उमदवारांच्या बाबतीत, अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेस उच्चतम शैक्षणिक अर्हता पदव्युत्तर पदवीधर, पदवीधर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे) धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्यक्रम दण्यात यईल.

  7. वरील अनुक्रमांक 1, 2 व 3 या तिन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत या पदाच्या प्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतम गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.