HSC Result 2021 : बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

HSC Result 2021 : बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
Updated on

Maharashtra State board HSC result : बारावीचा निकाल ३१ जुलैपूर्वी जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु आपत्कालीन परिस्थितीत निकाल तयार करण्याच्या कामकाजाला अधिक कालावधी लागल्याने निकाल एक-दोन दिवस लांबणीवर पडला आहे. राज्य मंडळातर्फे दहावी, बारावीचा निकाल पाहण्याची एकच लिंक आतापर्यंत उपलब्ध करून देण्यात येत होती. त्यामुळेच यंदा दहावीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना वेळेत निकाल पाहता आले नाहीत. या पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी एकापेक्षा अधिक लिंक उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे राज्य मंडळाकडून सांगण्यात येत आहे.

‘‘बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याबाबत शिक्षण विभागाकडून काळजी घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक लिंकवर बारावीचा निकाल पाहता येईल, याबाबत शिक्षण मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत,’’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

HSC Result 2021 : बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
पगार, EMI पासून ATM शुल्कापर्यंत उद्यापासून बदलणार नियम

कसा पाहाल निकाल?

निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर Maharashtra HSC result 2021 या पर्यायवर क्लिक करा. एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये आपला रोल नंबर आणि आईचं नाव टाकून सबमिट करा. त्यानंतर काही क्षणात रिझल्ट आपल्या स्क्रीनवर दिसेल. maharashtraeducation.com आणि mahahsscboard.maharashtra.gov.in. संकेतस्ळवारही निकाल पाहाता येणार आहे. तसेच बीएसएनएल मोबाईलचे यूजर्स ५७७६६ या नंबरवर MHHSC<space> <seatno> हा मेसेज पाठवून निकाल पाहू शकतात.

HSC Result 2021 : बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
"...तर CM ठाकरेच नव्हे, PM मोदीही तुमच्याकडे येतील"

निकालाचा फॉर्म्युला काय?

दहावी, अकरावी आणि बारावी अशा तीन वर्गांचे गुण विचारात घेऊन बारावीतील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. दहावी आणि अकरावीच्या लेखी परीक्षांचे प्रत्येकी 30 टक्के तर बारावीचे 40 टक्के गुण गृहित धरण्यात येणार आहेत. याशिवाय, बारावीचे अंतिम तोंडी परीक्षेचे गुणही विचारात घेतले जाणार आहेत.

HSC Result 2021 : बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
'मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, राणे पांढऱ्या पायाचे'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.