MH-SET : महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा

उमेदवारांकडे SET च्या विषयात विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी आवश्यक
Maharashtra State Eligibility Test savitribai phule pune university education
Maharashtra State Eligibility Test savitribai phule pune university educationesakal
Updated on

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्र आणि गोव्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये साहाय्यक प्राध्यापकांच्या पदासाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कला, विज्ञान, सामाजिक विज्ञान, वाणिज्य, कायदा, व्यवस्थापन, शिक्षण आणि शारीरिक शिक्षण इ. या विद्याशाखांतर्गत सध्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा ही परीक्षा घेतली जात आहे.

महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा २०२४ अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत वेब साइटवर जाहिरात प्रसिद्ध होईल. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.

पात्रता निकष

अ) उमेदवारांकडे SET च्या विषयात विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.

ब) पदव्युत्तर किंवा समकक्ष परीक्षेत किमान ५५ टक्के गुण (ग्रेसिंग किंवा राउंडिंग ऑफ न करता) मिळवले आहेत, ते पात्र आहेत.

क) ओबीसी/एसबीसी/डीटी(व्हिजे)/एनटी(नॉन-क्रिमी लेयर आणि एससी/एसटी/तृतीयपंथी/पीडब्लूडी/अनाथ ज्यांनी मास्टर्स किंवा समतुल्यमध्ये किमान ५० टक्के गुण (ग्रेसिंग किंवा राउंडिंग ऑफ न करता) असणे आवश्यक आहे.

ड) दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात किंवा पदव्युत्तर पदवीच्या चार सत्राच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोन सत्रात शिकत असलेले उमेदवार किंवा पाच वर्षांच्या एकात्मिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षात शिकत आहेत, ते या परीक्षेला बसण्यास पात्र नाहीत.

इ) SET साठी अर्ज करण्यासाठी, कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही.

परीक्षेचे ठळक मुद्दे

परीक्षा पातळी ः राज्य

परीक्षेची वारंवारता ः वर्षातून एकदा

परीक्षा पद्धत ः ऑफलाइन

परीक्षेचा कालावधी ः १२० मिनिटे

विषय पेपर १ ः अध्यापन आणि संशोधन योग्यता

पेपर २ ः ३२ विषय

परीक्षा शुल्क ः सर्वसाधारणसाठी ८५० रुपये

आरक्षितसाठी ः INR ६५०

गुणदान योजना

परीक्षेत दोन पेपर असतील. दोन्ही पेपरमध्ये केवळ वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि परीक्षेच्या दिवशी दोन स्वतंत्र सत्रांमध्ये खालीलप्रमाणे ब्रेक न घेता घेतले जातील. पेपर १ आणि पेपर २ मध्ये, उमेदवारांना प्रत्येक बरोबर उत्तरासाठी २ गुण दिले जातील. परीक्षेत चुकीची उत्तरे किंवा प्रयत्न न केलेल्या प्रश्नांसाठी नकारात्मक मार्किंग नसते.

सत्र पेपर एकाधिक-निवडक प्रश्नांची संख्या गुण कालावधी

प्रथम १ ५० प्रश्न हे सर्व अनिवार्य आहेत ५० x २ = १०० १ तास (स. १० ते ११)

द्वितीय २ १०० प्रश्न हे सर्व अनिवार्य आहेत १०० x २ = २०० २ तास (स. ११.३० ते दु. ०१.३० पर्यंत)

विषयांचा अद्ययावत अभ्यासक्रम

महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा UGC.NET आणि UGC-CSIR-NETच्या अभ्यासक्रमावर आधारित घेतली जाईल, जी खालील अधिकृत वेबसाइटवर अपडेट आणि अपलोड केला गेला आहे.

महत्त्वाच्या लिंक

https://setexam.unipune.ac.in

https://vidyarthimitra.org/news

(लेखक विद्यार्थी मित्र www. VidyarthiMitra.orgचे संस्थापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com