खेलेगा इंडिया... : पाठदुखी, कंबरदुखी

पाठ किंवा कंबर दुखणे खूप सामान्य आहे. हे पाठीच्या स्नायूंवर किंवा टेंडनवर पडलेल्या ताणामुळे (दुखापत) होऊ शकते.
Back pain
Back painsakal
Updated on
Summary

पाठ किंवा कंबर दुखणे खूप सामान्य आहे. हे पाठीच्या स्नायूंवर किंवा टेंडनवर पडलेल्या ताणामुळे (दुखापत) होऊ शकते.

- महेंद्र गोखले

पाठ किंवा कंबर दुखणे खूप सामान्य आहे. हे पाठीच्या स्नायूंवर किंवा टेंडनवर पडलेल्या ताणामुळे (दुखापत) होऊ शकते. इतर कारणांमध्ये संधिवात, शरीराच्या रचनेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि डिस्कच्या दुखापतींचा समावेश होतो. विश्रांती, शारीरिक उपचार आणि औषधोपचाराने वेदना बऱ्या होतात. निरोगी शरीर आणि योग्य वजन राखून तसेच सतत क्रियाशील राहून पाठदुखीचा धोका कमी करता येतो.

पाचपैकी तीन जणांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी पाठदुखीचा त्रास होतो.३० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना पाठदुखी जास्त असते. वजन जास्त, लठ्ठपणा आहे, त्यांना पाठदुखीची शक्यता जास्त असते. बैठी जीवनशैली असलेल्यांना पाठदुखीचा धोका जास्त असतो.

पाठदुखीची लक्षणे

  • पाठ हलवणे किंवा सरळ करणे तुम्हाला अवघड वाटू शकते. बसलेल्या स्थितीतून उठण्यास थोडा वेळ लागू शकतो. हालचालीवर मर्यादा आल्याचे तुम्हाला जाणवू शकते.

  • पाठदुखी असलेल्या अनेकांना सरळ उभे राहणे कठीण जाते. तुमच्या पाठीचा खालचा भाग वक्रऐवजी सपाट दिसू शकतो.

  • ताण पडल्यानंतर, पाठीच्या खालच्या भागातील स्नायूमध्ये अनियंत्रितपणे कळ येते किंवा ते आकुंचन पावू शकतात. स्नायूंच्या अशा कळ येण्यामुळे खूप वेदना होतात आणि उभे राहणे, चालणे किंवा हालचाल करणे कठीण किंवा अशक्य होते.

कंबरदुखीची कारणे

  • हाडे ठिसूळ होऊ शकतात, हाडांच्या डेन्सिटीच्या समस्या उद्‍भवू शकतात. पाठ आणि कंबरदुखीदेखील होऊ शकते. ओस्टिओआर्थरायटिस हा सर्वांत सामान्य प्रकारचा संधिवात आहे; ज्यामुळे पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात. स्पॉन्डिलोलिस्थेसिसमुळे पाठदुखी आणि अनेकदा पाय दुखणेदेखील उद्‍भवते.

पाठदुखी कशी टाळावी?

योग्य वजन राखा : जास्त वजनामुळे पाठीच्या कण्यावर आणि डिस्कवर दबाव येतो.

ओटीपोटाचे स्नायू बळकट करा : पोस्ट्चरल व्यायाम आणि इतर व्यायाम मणक्याला आधार देऊन मुख्य स्नायू मजबूत करतात. स्ट्रेन्थचे व्यायाम देखील उपयोगी पडू शकतात.

योग्य मार्गाने उचला : जखम टाळण्यासाठी, वजन उचलण्यासाठी पायातील ताकदीचा वापर करा, पाठीच्या नाही. जड वस्तू शरीराच्या जवळ ठेवा. तुम्ही उचलत असताना तुमचे धड वळवू नका.

लवचिकता राखणे : पाठीच्या दुखापती टाळण्यासाठी शरीराच्या वरच्या भागाची गतिशीलता आणि लवचिकतादेखील महत्त्वाची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()