वजन कमी करणे आणि फॅट कमी करणे म्हणजे दोन्ही सारखेच असते हा विचार करणे साहजिक आहे.
- महेंद्र गोखले
वजन कमी करणे आणि फॅट कमी करणे म्हणजे दोन्ही सारखेच असते हा विचार करणे साहजिक आहे. कोणत्याही प्रकारे, आपल्याला असा परिणाम हवा आहे, ज्यात होणारा बदल निरोगी असावा आणि आपल्या आरोग्यासाठी योग्य असावा. वास्तविक फॅट कमी होण्यामुळे वजन कमी होण्याबरोबरच इतरही काही गमावले जाते.
अनेक व्यक्तींसाठी, फॅट कमी करणे हे ध्येय असते. आपण वजन कमी करणे आणि फॅट कमी करणे यातील फरक समजावून घेऊ. वजन कमी होणे म्हणजे शरीराच्या वजनात एकूण घट होणे, तर फॅट कमी होणे म्हणजे शरीरातील चरबी कमी करणे. वजन कमी करता तेव्हा तुम्ही फक्त शरीरातील चरबी कमी करत नाही. शरीरातील चरबी, लीन बॉडी मास आणि बॉडी वॉटर यामध्ये बदल करता. वजन वाढण्याच्या बाबतीतदेखील हीच प्रक्रिया होते.
वजन कमी होणे
तुमच्यासाठी अनेक आहार आणि व्यायाम कार्यक्रम फॅट कमी करण्यास मदत करतील. असा कार्यक्रम महत्त्वाच्या गोष्टीवर आधारित असावा, तो म्हणजे व्यायामामुळे शरीरातील ऊर्जा वाढवणे आणि अन्नातून ऊर्जा कमी करणे. अशा संयोगांमुळे शरीरातील फॅट आणि स्नायूंसह आपल्या शरीरातील टिशूझनी गमावलेली ऊर्जा भरून काढण्यास मदत होते. शरीराला आवश्यक ऊर्जा फॅटमधून मिळवू शकलात तर ते फारच छान होईल,परंतु ते तसे होत नाही. तुमचे वजन कमी होईल, तसतसे तुम्ही शरीरातील फॅट व्यतिरिक्त लीन बॉडी मासच्या स्वरूपात काही स्नायूही गमावू शकता.
फॅट कमी होणे
शरीरातील फॅट, म्हणजे अशी फॅट जी शरीरात महत्त्वपूर्ण कार्य करण्याची भूमिका बजावते आणि फॅट साठवलेली असते; या दोन्हीचा संयोग! स्टोअरेज फॅट म्हणजे अॅडिपोज टिश्यू. ते ऊर्जासाठा म्हणून शरीरात जमा झाले आहेत. आहारात आणि व्यायामात बदल केल्याने या प्रकारची फॅट दृश्यमानपणे बदलेल. खूप जास्त स्टोअरेज फॅट आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते.
फॅट कमी करण्याचे फायदे
लठ्ठपणा आणि क्रोनिक आजार यांच्यात स्पष्ट संबंध असतो त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये अव्यवस्थित खाण्यासारखे अनपेक्षित परिणाम होऊ शकतात. म्हणूनच फॅट कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणे आणि निरोगी शरीर रचना राखणे हाच दृष्टिकोन आहे. लक्षात ठेवा वजन हे लीन बॉडी मास, शरीरातील फॅट आणि पाण्याचे बनलेले असते, त्यामुळे या घटकांमधील कोणत्याही बदलांमुळे वजन वाढू शकते, केवळ फॅट कमी केल्याने होत नाही.
शरीरातील अतिरिक्त फॅट, विशेषतः साठवलेल्या फॅटचा दीर्घकालीन आजारांशी खूप जवळचा संबंध आहे.
टाइप २ मधुमेह
उच्च रक्तदाब
हृदयरोग
विविध कर्करोग
निरोगी शरीरातील फॅटची टक्केवारी राखल्याने अशा आजारांचा धोका कमी होण्यास आणि तुमचे मानसिक आरोग्य आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
आपण वजन कमी करतो तेव्हा फॅटपेक्षा जास्त काहीतरी गमावतो. हे नुकसान कदाचित लीन बॉडी मासचे असू शकते. तुमचा बेसल मेटाबॉलिक रेट (BMR) म्हणजे तुमचे शरीर नैसर्गिकरित्या विश्रांतीच्या वेळी जाळत असलेल्या कॅलरीजची संख्या आहे. तुम्ही वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित करता आणि लीन बॉडी मास वाढवण्यासाठी प्रयत्न करत नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या मेटाबॉलिझमचा आकार कमी होत जातो. गमावलेली मेटाबॉलिझम /वजन परत न येण्यासाठी बॉडी मास राखणे महत्त्वाचे आहे. लीन बॉडी मास आणि मेटाबॉलिझममध्ये खूप मोठी तफावत असणे अजिबात योग्य नाही. म्हणूनच केवळ वजन कमी करण्याऐवजी स्नायू कमावणे आणि फॅट कमी करणे यावर केंद्रित करणारा दृष्टिकोन असणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.