भारतीय तटरक्षक दलात नाविक अन्‌ यांत्रिक पदांची मोठी भरती!

भारतीय तटरक्षक दलात नाविक अन्‌ यांत्रिक पदांची मोठी भरती!
Coast Guard
Coast GuardCanva
Updated on
Summary

भारतीय तटरक्षक दलामध्ये (ICG) खलाशी व मेकॅनिकल भरतीची तयारी करत असलेल्या इच्छुकांसाठी महत्त्वाचे अपडेट.

भारतीय तटरक्षक दलामध्ये (Indian Coast Guard - ICG) खलाशी व मेकॅनिकल भरतीची तयारी करत असलेल्या इच्छुकांसाठी महत्त्वाचे अपडेट. भारतीय तटरक्षक दलाने नाविक (Sailor) (जनरल ड्यूटी), नाविक (डोमेस्टिक ब्रॅंच) आणि यांत्रिक पदांच्या एकूण 322 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ICG ने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, इच्छुक उमेदवार 4 जानेवारी सकाळी 11 ते 14 जानेवारी 2022 सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतील. त्याच वेळी विहित निवड प्रक्रियेअंतर्गत मार्च 2022 मध्ये लेखी परीक्षा प्रस्तावित आहे आणि परीक्षेला बसण्यासाठी प्रवेशपत्रे परीक्षेच्या तारखेच्या 2 किंवा 3 दिवस आधी जारी केली जातील. त्याच वेळी ICG परीक्षेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत नाविक / मेकॅनिकल लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करेल. (Major recruitment of sailor and mechanical posts in Indian Coast Guard)

Coast Guard
दहशत कोरोनाची... पंजाबमध्ये शाळा-कॉलेज बंद! अनेक निर्बंध लागू

असा करा अर्ज

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना भारतीय तटरक्षक दल (ICG) च्या अधिकृत वेबसाइट, joinindiancoastguard.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर, होम पेजवरच ऑनलाइन अर्ज सक्रिय करण्यासाठी लिंकवर क्‍लिक करा. यानंतर, नवीन पेजवर उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर त्यांच्या तपशिलांसह लॉग इन करून अर्ज सबमिट करावा लागेल. अर्जादरम्यान उमेदवारांना 250 रुपये शुल्क देखील भरावे लागेल, जे ऑनलाइन माध्यमातून भरता येईल.

Coast Guard
ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सरकारी नोकऱ्या! 'या' पदांची भरती

कोण अर्ज करू शकतो?

  • नाविक (जनरल ड्यूटी) : भारतीय तटरक्षक दलातील नाविक (जनरल ड्यूटी) या पदांसाठी मान्यताप्राप्त मंडळातून गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह 10+2 उत्तीर्ण झालेले उमेदवारच अर्ज करू शकतात. तसेच उमेदवारांचे वय 18 ते 22 वर्षे यादरम्यान असावे.

  • नाविक (डोमेस्टिक ब्रॅंच) : या पदांसाठी उमेदवार दहावी पास असावा. उमेदवारांचे वय 18 ते 22 वर्षे यादरम्यान असावे.

  • यांत्रिक : या पदांसाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावा. उमेदवारांचे वय 18 ते 22 वर्षे यादरम्यान असावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.