कौतुकाच्या रंगात न्हाला पुत्र रंगाऱ्याचा! मायणीचा सचिन CET परीक्षेत अव्वल

Sachin Sugdare
Sachin Sugdareesakal
Updated on
Summary

ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने राज्यस्तरीय परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

मायणी : एमबीए (MBA), इंजीनियरिंग, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी (PCM) 2021 च्या सामायिक प्रवेश परीक्षेत येथील सचिन गणेश सुगदरे (Sachin Sugdare) या रंगाऱ्याच्या मुलाने शंभर पर्सेंटाइलसह फस्ट रँक मिळवली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून झालेल्या कौतुकाच्या रंगात तो अक्षरशः न्हाऊन निघाला आहे.

मायणीसारख्या (Mayani Village) ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने राज्यस्तरीय परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. हेच अनेकांसाठी अविश्वसनीय आहे. दोनशे पैकी १९४ गुणांसह शंभर पर्सेंटाइल मिळविणारा सचिन सातारा जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सचिनने हे अभूतपूर्व यश मिळविले आहे. त्याच्या चौकोनी कुटुंबात आईवडील आणि दोघे भाऊ राहतात. शेती तोकडी असल्याने संसाराचा गाडा नीट चालविण्यासाठी रंगकामाचा जोडधंदा करावा लागतो. आई घरीच असते. सचिनने शिकून मोठे व्हावे. ही पालकांची इच्छा. सचिनने दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून बुध्दीमत्ता सिद्ध करून दाखवली. विटा येथील रयतच्या बळवंत कॉलेजमध्ये त्याने अकरावीसाठी प्रवेश घेतला. मात्र आजापणामुळे तो रद्द करून पुन्हा येथील भारतमाता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये दाखल झाला. घरी शिक्षणाचा वारसा, प्रभाव नसतानाही त्याने मोठ्या जिद्दीने व चिकाटीने अभ्यास केला. उपलब्ध पुस्तके, नोट्स च्या माध्यमातून सातत्यपूर्ण अभ्यास करून ते यश मिळविले आहे.

Sachin Sugdare
CRPF मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मुलाखतीव्दारे होणार थेट निवड

तब्बल दोन लाख २८ हजार शंभर विद्यार्थ्यांनी नोंदणी करून एक लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पीसीबी ग्रूपसाठी दोन लाख त्यामध्ये पीसीएम आणि पीसीबी ग्रूपक दोन्ही ग्रुपमधील २८ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले आहे. त्या टॉपर मध्ये सचिन हा जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी आहे. त्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. भारतमाता ज्युनिअर कॉलेजतर्फे त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकाऱ्यांनी सचिनचे तोंडभरून कौतुक करीत त्याला पुढील शिक्षणासाठी ऊर्जा दिली. दरम्यान, शिक्षण संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, सचिव सुधाकर कुबेर, सर्व संचालक, प्राचार्य विजयकुमार पिसाळ व त्यांचे सहकारी, सर्व शिक्षक, ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले.

Sachin Sugdare
Political : फार्म हाऊसवर ठरला 'मास्टर प्लान'; भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांत खलबत्तं

कोरोनाची स्थिती भयंकर असतानाही शिक्षकांनी ऑनलाईन अभ्यास करून घेतला. घरी बसूनच आनलाईन तासिका, सराव परीक्षा सोडविल्या. आता टॉपच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे.

-सचिन सुगदरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.