काळाच्या ओघात महत्त्व किंचित कमी झाले आहे असे वाटू शकणारा, पण खरे तर महत्त्व वाढतच गेलेला आणि कधीही लोप न पावणारा असा आणखी एक अभियांत्रिकीचा गाभ्याचा प्रकार म्हणजे यांत्रिकी अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग). बहुधा असे एकही घर सापडणार नाही की, ज्यात यांत्रिकी पद्धतीने ‘तयार’ केलेली वस्तू सापडणार नाही. संपूर्ण देशाचे अर्थकारण ज्यावर अवलंबून आहे अशी ही अभियांत्रिकी आहे.