विचारपूर्वक भरा...अकरावी प्रवेशाच्या अर्जाचा भाग दोन

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अकरावी प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाइन अर्जाचा तुमचा (अर्ज भाग एक) पार्ट वन तर भरून झाला, नुकताच तुमचा निकालही लागला आहे. त्याबाबत तुमचे हार्दिक अभिनंदन! आता तुम्हाला अर्जाचा भाग दोन भरायचा आहे, होय ना?...
Medha Sinnarkar writes Fill carefully Part Two of the Eleventh Admission Application
Medha Sinnarkar writes Fill carefully Part Two of the Eleventh Admission Applicationsakal
Updated on
Summary

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अकरावी प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाइन अर्जाचा तुमचा (अर्ज भाग एक) पार्ट वन तर भरून झाला, नुकताच तुमचा निकालही लागला आहे. त्याबाबत तुमचे हार्दिक अभिनंदन! आता तुम्हाला अर्जाचा भाग दोन भरायचा आहे, होय ना?...

- मेधा सिन्नरकर

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अकरावी प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाइन अर्जाचा तुमचा (अर्ज भाग एक) पार्ट वन तर भरून झाला, नुकताच तुमचा निकालही लागला आहे. त्याबाबत तुमचे हार्दिक अभिनंदन! आता तुम्हाला अर्जाचा भाग दोन भरायचा आहे, होय ना?... परंतु अर्जाचा भाग दोन तुम्ही खूप विचारपूर्वक भरणं आवश्यक असते. त्यासाठी महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मार्गदर्शनासाठी देत आहे.

प्रथम अर्जाचा भाग एक व्हेरिफाय झालेला आहे ना, याची खात्री करा. कारण जोपर्यंत अर्जाचा भाग एक व्हेरिफाय होत नाही तोपर्यंत अर्जाचा भाग दोन ओपन होणार नाही. आता तुमचा अर्ज व्हेरीफाय झाला असेल, तर अर्जाचा भाग दोन ओपन झाला असेल. त्यावेळी सर्वप्रथम आपणास किती टक्के गुण आहेत? आणि आपल्याला हवे असलेल्या महाविद्यालयाचा मागील वर्षीचा कट ऑफ किती होता? या दोन्हीचा पूर्ण विचार करा. आपली टक्केवारी ही कोणत्या-कोणत्या कॉलेजला योग्य आहेत, त्यापैकी कोणते महाविद्यालय आपल्याला योग्य आहे आणि हो आपल्या घरापासून महाविद्यालयाचे अंतर किती आहे याचाही विचार करायला हवा.

त्या नंतरचा मुद्दा आपल्याला हव्या असलेल्या महाविद्यालयामध्ये किती अनुदानित आणि किती विनाअनुदानित तुकड्या आहेत, त्यांची फी किती आहे, हे लक्षात घ्या. कारण कधी-कधी हवे असलेले महाविद्यालय मिळते; परंतु विनाअनुदानित तुकडी मिळाली हे नंतर लक्षात येते. आणि त्याची फी आपल्या आवाक्याबाहेर आहे, हे देखील उशिरा कळते. म्हणून हा विचार आधीच व्हायला हवा.

आता पुढचा मुद्दा विषयाबद्दलचा आहे. आपल्याला जे विषय हवे आहेत ते आपण निवडत असलेल्या कॉलेजमध्ये आहेत का हे आधी तपासून घ्या. उदाहरणार्थ जर्मन, फ्रेंच, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक अशा प्रकारचे विषय निवडताना हा विचार होणे आवश्यक आहे. आणि हो दहा कॉलेजची निवड पूर्ण केल्यावर फॉर्म लॉक करण्यास अजिबात विसरू नका आणि तितकेच महत्त्वाचे ऑनलाइन सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लॉग इन आयडी आणि पासवर्ड नक्की नक्की जपून ठेवा. आणि समजा पहिल्या दुसऱ्या फेरीत ॲडमिशन नाही मिळाली तरी घाबरू नका, हताश होऊ नका. अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असली, तरी प्रत्येकाला प्रवेश हा मिळतोच. मनासारखे महाविद्यालय मिळाले नाही तर कदाचित पुढच्या फेरीत ते मिळण्याची संधी मिळू शकते, तेव्हा चिंता नको. सर्वांना पुढील करिअरसाठी शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.