वैद्यकीय अधिकारी भरतीच्या संधीची वाट पाहात असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची ही उत्तम संधी आहे.
सोलापूर : वैद्यकीय अधिकारी भरतीच्या (Medical Officer Recruitment) संधीची वाट पाहात असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची (Government Job) ही उत्तम संधी आहे. भारत सरकारच्या (Government of India) गृह मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय सशस्त्र सीमा बल (Central Armed Border Force) (CABF) च्या वैद्यकीय अधिकारी निवड मंडळाने (Medical Officer Selection Board) (MOSB) वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
मंडळाद्वारे करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत भरतीनुसार सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड), स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट), सीएपीएफ (बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि आसाम रायफल्स) मधील वैद्यकीय अधिकारी (सहाय्यक कमांडंट), डेंटल सर्जन (सहाय्यक कमांडंट) अशा एकूण 533 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जाणार आहेत.
असा करा अर्ज
इच्छुक उमेदवार ITBP च्या भरती पोर्टल recruitment.itbpolice.nic.in वर उपलब्ध ऑनलाइन फॉर्म भरून अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 13 सप्टेंबर 2021 रोजी सुरू होणार आहे आणि उमेदवार 27 ऑक्टोबर 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. सामान्य श्रेणी, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करताना 400 रुपये शुल्क भरावे लागेल. तथापि एससी, एसटी, माजी कर्मचारी आणि महिला उमेदवारांना अर्जाच्या शुल्कामध्ये पूर्ण सूट देण्यात आली आहे.
http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_19143_8_2122b.pdf या लिंकद्वारे पाहा भरती जाहिरात
अर्जाची लिंक https://recruitment.itbpolice.nic.in/
जाणून घ्या पात्रता
स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस पदवीधर असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही राज्य वैद्यकीय रजिस्टरमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच त्याने / तिने विहित अनिवार्य इंटर्नशिप केलेली असावी. तसेच उमेदवाराचे कमाल वय 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी (सहाय्यक कमांडंट) पदासाठी उमेदवारांनी ऍलोपॅथिक पद्धतीमध्ये वैद्यकीय पदवी उत्तीर्ण केलेली असावी आणि विहित अनिवार्य इंटर्नशिप केलेली असावी. या पदाकरिता उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. शैक्षणिक पात्रतेसाठी भरती जाहिरात आणि इतर पदांसाठी आवश्यक इतर तपशील पाहा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.