Meesho Jobs : सणासुदीच्या काळात 'मीशो'कडून नोकरीची मोठी संधी! येत्या काळात देणार पाच लाख नोकऱ्या

Meesho 500000 job opportunities in upcoming festive season Jobs in e-commerce firm marathi news
Meesho 500000 job opportunities in upcoming festive season Jobs in e-commerce firm marathi news
Updated on

प्रसिद्ध ई-कॉमर्स फर्म मीशोने आगामी सणासुदीच्या काळात वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ते विक्रेता आणि लॉजिस्टिक नेटवर्कमध्ये जवळपास 5 लाख हंगामी नोकऱ्या देणार असल्याची घोषणा केली आहे. मीशोने गेल्या वर्षी निर्माण केलेल्या हंगामी नोकऱ्यांच्या तुलनेत ही 50 टक्के वाढ आहे.

आगामी सणासुदीच्या काळात ईकॉम एक्सप्रेस, डीटीडीसी, इलास्टिक रन, लोडशेअर, दिल्लीव्हरी, शॅडोफॅक्स आणि एक्सप्रेसबीज यांसारख्या थर्ड पार्टी लॉजिस्टिक भागीदारीद्वारे सुमारे 2 लाख रोजगार संधी निर्माण करण्याचे मीशोचे उद्दिष्ट आहे. यातील 60 टक्क्यांहून अधिक संधी या टियर-III आणि टियर-IV भागात असणार आहेत. या नोकऱ्यांमध्ये प्रामुख्याने उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत ऑर्डर पोहचवणारे, डिलिव्हरी पिकिंग, सॉर्टिंग, लोडिंग, अनलोडिंग आणि रिटर्न इन्स्पेक्शन यासारख्या कामांसाठी लागणाऱ्या सहकाऱ्यांचा समावेश असेल.

Meesho 500000 job opportunities in upcoming festive season Jobs in e-commerce firm marathi news
PM Modi: होमलोनबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय! लोकसभा निवडणुकीपूर्वी देणार मध्यमवर्गीयांना गिफ्ट

'मीशो'मधील एक वरिष्ठ अधिकारी सौरभ पांडे यांनी सांगितेल की, आम्हाला या सणासुदीच्या काळात मागणीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे, या नोकरीच्या संधी निर्णाण करण्याची प्रक्रिया ही या सणासुदीच्या काळात ग्राहकांचा एकंदरीत अनुभव वाढवण्यावर आणि असंख्य लहान व्यवसायांना सक्षम बनविण्यावर केंद्रित आहे.

तसेच मीशो विक्रेते सणासुदीच्या हंगामासाठी 3 लाख हंगामी कामगारांना कामावर ठेवण्याचा अंदाज आहे. हे हंगामी कामगार ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मीशोच्या विक्रेत्यांना उत्पादन, पॅकेजिंग आणि वर्गीकरण यासह विविध कामांमध्ये मदत करतील. तसेच मीशोचे 80 टक्क्यांहून अधिक विक्रेते फॅशन अॅक्सेसरीज आणि उत्सवाची सजावट यासारख्या नवीन कॅटेगरीमध्ये देखील नवीन उत्पादने घेऊन येण्याच्या विचारात आहेत. वाढत्या मागणीसाठी तयारीचा भाग म्हणून मीशोचे 30 टक्क्यांहून अधिक विक्रेते हे सध्या स्टोरेज स्पेस भाड्याने घेण्यासाठी गुंतवणूक देखील करत आहेत.

Meesho 500000 job opportunities in upcoming festive season Jobs in e-commerce firm marathi news
Sunroof Car Drawbacks : Sunroof कारचे फायदे कमी अन् तोटेच जास्त, घेण्याआधी हजारवेळा विचार करा

भारताच्या थर्ड-पार्टी लॉजिस्टिक (3PL) इकोसिस्टममध्ये मीशोचे मोठे योगदान आहे. तसेच आर्थिक वर्ष 2023 मध्ये मीशओने थर्ड पार्टी लॉजिस्टिक शिपमेंट दुप्पट करून 1.2 अब्ज पेक्षा जास्त करण्याचा कंपनीचा विचार आहे.

स्टाफिंग सोल्यूशन्स कंपनी टीमलीज (TeamLease)च्या म्हणण्यानुसार, ई-कॉमर्स कंपन्या आगामी सणासुदीच्या हंगामात प्रचंड वाढलेल्या मागणीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, भारतात यासंबंधी कामगारांसाठी 500,000 नवीन नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे.

देशात प्रामुख्याने डिलिव्हरी स्पेस आणि वेअरहाऊस ऑपरेशन्समध्ये अशा हंगामी कामगारांसाठी सुमारे 200,000 नोकरीच्या संधी आहेत. तर डिसेंबरपर्यंत हे प्रमाण 700,000 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

टीमलीजने सांगितले की, या वर्षी अशा नोकऱ्यांमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 25 टक्के वाढ अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, बेंगळुरू, दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद यांसारख्या टियर-I शहरांच्या तुलनेत टियर-II आणि टियर-III शहरांमध्ये वेअरहाऊसिंग ऑपरेशन्स, डिलिव्हरी कर्मचारी आणि कॉल सेंटर ऑपरेटरची मागणी जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.