Meta : नोकरी वाचवायची असेल तर 200 टक्के मेहनत करा, अन्यथा कायमचं घरी जा; झुकेरबर्गचा थेट इशारा

'मेटा'मध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी येणारे काही महिने खूपच कठीण जाणार आहेत.
CEO Mark Zuckerberg
CEO Mark Zuckerbergesakal
Updated on
Summary

'मेटा'मध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी येणारे काही महिने खूपच कठीण जाणार आहेत.

Mark Zuckerberg News : 'मेटा'मध्ये (Meta) काम करणाऱ्या लोकांसाठी येणारे काही महिने खूपच कठीण जाणार आहेत. यामागील कारणही तसंच आहे. टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याचं कळतंय.

अशी माहिती समोर आलीय की, META कर्मचार्‍यांना कंपनीमध्ये त्यांची नोकरी सुरक्षित ठेवण्यासाठी दुप्पट मेहनत करण्यास सांगितलं जात आहे. कंपनीत नोकरी करायची असेल तर कामात 200 टक्के मेहनत करावी लागेल, असं कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलंय. इनसाइडरशी झालेल्या संभाषणात मेटा कर्मचाऱ्यानं सीईओ मार्क झुकरबर्गच्या (CEO Mark Zuckerberg) संदेशाविषयी सांगितलं की, 'झुकरबर्ग यांचा संदेश अतिशय स्पष्ट होता. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडं तीन महिने आहेत. तुमचे 200 टक्के प्रयत्न करा, नाहीतर तुम्हाला हे सर्व आवडत नसेल तर राजीनामा द्या.' मेटा स्टॉकच्या किमती सातत्यानं घसरत असताना कर्मचाऱ्यांना दुप्पट मेहनत करण्यास सांगितलं जात आहे.

CEO Mark Zuckerberg
Twitter Deal : 10 महिन्यांपूर्वी ट्विटरमध्ये होती 5 टक्के हिस्सेदारी; आता मस्क बनले मालक

झुकेरबर्गकडून कर्मचाऱ्यांवर अधिक मेहनत घेण्याचा दबाव टाकला जात आहे. त्याच वेळी मेटानं आपले अनेक संघ आणि व्यवस्थापक बदलले आहेत. सध्या कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापकाच्या म्हणण्यानुसार, उत्तम काम करणाऱ्या लोकांच्या नोकऱ्याही सुरक्षित नाहीयेत. कंपनीच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेटामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. दुसऱ्या तिमाहीच्या निकालांनुसार, मेटाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या तीन कंपन्यांमध्ये 83,500 कर्मचारी काम करत आहेत. पुढील वर्षी 20 टक्के लोक कमी होतील, अशी भीती लोकांमध्ये आहे.

CEO Mark Zuckerberg
Twitter Deal : ..तर Elon Musk ला पराग अग्रवालांना द्यावे लागणार 346 कोटी; जाणून घ्या का?

वर्षभरात कर्मचारी कमी केले जातील : झुकरबर्ग

इनसाइडरच्या अहवालानुसार, 'मेटा प्रतिनिधीनं 27 जुलै रोजी कंपनीच्या कमाईच्या अहवालादरम्यान झुकरबर्गच्या विधानाविषयी माहिती दिली. झुकेरबर्ग म्हणाले, मेटा पुढील वर्षभरात कर्मचारी कमी करणं सुरू ठेवण्याची योजना आखत आहे. यात अनेक संघ कमी केले जाणार आहेत, जेणेकरून आम्ही इतर भागात कर्मचारी वर्ग करू शकू. आम्ही सध्या आमचं लक्ष गाठण्याचा प्रयत्न करत आहोत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.