म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) (Mhada) सरळ सेवा भरतीमध्ये (Recruitment) तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील 565 पदे भरण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने (Offline Process) होणारी परीक्षा (Exam) आता ऑनलाईन पद्धतीने 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हाडाच्या परीक्षांकरिता विद्यार्थ्यांना (Student) ऑनलाईन पद्धतीने प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी गुरुवारी (ता. 27) दिली.
म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येणार आहे. या ऑनलाईन परीक्षांबद्दल माहिती देताना सागर म्हणाले की, परीक्षांबाबत अद्ययावत माहितीकरिता सर्व विद्यार्थ्यांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळास नियमितपणे भेट द्यावी. ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरिता म्हाडाच्या https.mhada.gov. in या संकेतस्थळावर 22 जानेवारी, 2022 पासून https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/31659/75245/login.html ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया सोयीची ठरावी याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर 26 जानेवारीपासून मॉक लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. https://g06.tcsion.com:443//OnlineAssessment/index.html?31659@@M211 या मॉक लिंकद्वारे उमेदवारांना परीक्षेचे साधारण स्वरूप समजून घेता येणार असून ऑनलाईन परीक्षा कशी द्यावी याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर परीक्षा दिल्यानंतर सर्व उमेदवारांना म्हाडा प्रशासनातर्फे एक लिंक उपलब्ध करून दिली जाणार असून, या लिंकवर उमेदवारांना त्यांचा पेपर उत्तरासह पाहता येणार आहे. परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका व उत्तर तालिका बाबत काही आक्षेप असतील तर आक्षेप नोंदविण्याकरिता उमेदवारांना तीन दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. आक्षेपांबाबत निर्णय झाल्यानंतर, ज्या क्लस्टरकरिता एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घेतली गेली आहे, त्या क्लस्टरकरिता नॉर्मालिसेशन प्रोसेस (https://www.mhada.gov.in/sites/default/files/Notification_for_Normalisation_MHADA_Recruitment_2021-dtd-14-1-2022.pdf) पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सागर यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेताना म्हाडाकडून सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. एखाद्या उमेदवारास कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास त्यांना विलगीकरण कक्षात बसविण्याची सोय करण्यात आली आहे. म्हाडा सरळसेवा परीक्षा संपूर्णपणे पारदर्शी व सुरळीतपणे व्हावी तसेच पदभरतीमध्ये निव्वळ गुणवत्ताधारक व निकषांच्या अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची नेमणूक व्हावी, याकरिता सर्व खबरदारी म्हाडा प्रशासनाकडून घेण्यात येत आहे, अशी माहिती सागर यांनी दिली.
म्हाडा प्रशासनाद्वारे सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की, म्हाडा सरळ सेवा परीक्षा प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक रित्या राबवत आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या, मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये आणि कोणत्याही गैरमार्गांचा अवलंब करू नये. अशा प्रकारे जर कोणी प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळल्यास अशा व्यक्तींची तक्रार म्हाडा प्रशासन, म्हाडा दक्षता व सुरक्षा विभाग किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.