MHT-CET Exam Result : एमएचटी सीईटीत पुण्याचेच वर्चस्व

राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी सीईटी) निकाल घोषीत झाला असून, शंभर पर्सेंटाईल मिळालेल्या २८ विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थी पुण्यातील.
MHT CET Result 2023
MHT CET Result 2023Esakal
Updated on

पुणे - राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी सीईटी) निकाल घोषीत झाला असून, शंभर पर्सेंटाईल मिळालेल्या २८ विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थी पुण्यातील आहेत. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा चाचणी सेलकडून घेण्यात आलेल्या निकालात पुण्याचे वर्चस्व राहिले आहे. विशेष म्हणजे टॉपर्सच्या यादीत १३ मुलींनीही स्थान पटकावले आहे.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या गटात १४ आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) या गटात १४ जणांना शंभर पर्सेंटाईल मिळाले आहेत. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही परीक्षा अनिवार्य आहे.

एकूण २८ जणांच्या टॉपर्सच्या यादीत पुण्यातील तनिष चुडीवाल, अपुर्वा महाजन, कृष्णा काब्रा, अबोली माळशिकारे, मृण्मयी भालेराव सेजल राठी आणि आर्या तुपे यांचा समावेश आहे. या यादीत मुंबईतील पाच विद्यार्थी तर ठाण्यातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. १०० पर्सेंटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये खुल्या गटातील २४ जण आहेत. तर तन्मयी संगेवार आणि मनोमय पवार हे ओबीसी गटातील टॉपर्स आहेत. या गटात वेदांत पांडे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

MHT CET Result 2023
Pune News : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बालभारतीची चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध

एससी गटात आयुष्य रामटेके (पीसीबी - ९९.९९) आणि योग सोनवणे (पीसीएम - ९९.९५) हे दोघे टॉपर्स आहेत. एसटी गटात विवेक सुरेवाड (पीसीबी - ९९.९६) व अथर्व बच्चावार (पीसीएम - ९९.८९) हे अव्वल ठरले आहेत.

एमएचटी सीईटीचा गोषवारा -

एकूण नोंदणी - ६ लाख ३६ हजार ८९

पीसीएम गट - ३ लाख ३ हजार ४८

पीसीबी गट - २ लाख ७७ हजार ४०३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.