- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस
आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात की, मुले जन्माला घालणे ही न परवडणारी गोष्ट आहे, मूल जन्माला आले की, खर्च प्रचंड वाढतील अशी त्यांची धारणा असते. यामागील कारण त्यांची एकंदर परिस्थिती हे नसून, त्यांची मानसिकता आणि त्यांनी करून घेतलेले स्वतःचे काही समज, हे आहे. आपण जगाकडे कसे पाहतो आणि त्यातून मुलांविषयीची आपली मते कशा प्रकारे तयार करतो हे तपासून पाहायला हवे!