नागपूर : राज्य बोर्डाचा व सीबीएसईचा दहावीचा निकाल लागल्याने उच्च माध्यमिक वर्गात समाविष्ट असलेल्या अकरावीच्या प्रवेशासाठी (11th admission) पालक व विद्यार्थी प्लॅनिंग करीत आहेत. तथापि, अकरावीचे प्रवेश वैकल्पिक सीईटीमध्ये (CET for 11th admission) मिळविलेल्या गुणांच्या आधारावर होणार आहेत. सीईटीमध्ये चांगले गुण मिळावेत यासाठी कसून अभ्यास करीत आहेत. यावेळी दहावीत चांगले गुण मिळाल्याने नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांचा कल सायन्सकडे अधिक राहण्याची शक्यता आहे.
अकराव्या वर्गात सायन्समध्ये प्रवेश घेतल्यावर बारावीनंतरच्या सर्व शाखांमध्ये प्रवेशाची द्वारे खुली असतात. याशिवाय मेडिकल, इंजिनिअरिंगसह इतर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी सायन्समधून बारावीची परीक्षा देणे आवश्यक आहे. यावर्षी अकरावीचे प्रवेश सीईटी मेरीटच्या आधारावर दिले जाणार आहेत. यामुळे प्रवेशासाठी जोरदार स्पर्धा दिसेल. ही स्पर्धा नामांकित महाविद्यालयांसाठी अधिक असेल.
द्विलक्षी अभ्यासक्रमांकडे सर्वाधिक कल -
मेडिकलसह इंजिनिअरिंग करण्याची इच्छा असलेले विद्यार्थी अकरावीच्या द्विलक्षी अभ्यासक्रमात प्रवेश घेतात. द्विलक्षी अभ्यासक्रमात १०० गुणांचे प्रात्यक्षिक असल्याने विद्यार्थ्यांना टक्केवारी वाढविण्यात हातभार लागतो. सायन्सच्या फिजिक्स, केमेस्ट्री, मैथ्स आणि बायोलॉजी यापैकी एक विषय कमी होत त्याजागी कॉम्प्यूटर सायन्स, आयटी किंवा फिशरी हा विषय घेण्याची मुभा आहे. याचमुळे आयआयटी, नीट किंवा एआयआयआयची तयारी करण्यासाठी वेळ मिळतो. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात सुमारे पाच हजारावर द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या जागा आहेत. तरीही मागील वर्षी जागा रिक्त होत्या.
१०० गुणांची सीईटी परीक्षा
दहावीची परीक्षा झाली नसल्याने पालक विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे आकलन करू शकले नाहीत. यामुळेच विद्यार्थी सीईटीचा मन लावून तयारी करीत आहेत. सीईटीमध्ये मिळविलेले गुण त्यांना त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देणार आहेत. १०० गुणांसाठी असलेल्या सीईटीमध्ये १५० प्रश्न विचारले जातील. सीईटी ऑफलाइन होणार असल्याने सर्वांच्या नजरा या परीक्षेकडे लागल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.