Startup Layoffs : गुंतवणूक आटली! सहा महिन्यांत १७ हजार कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या, स्टार्टअप कंपन्यांकडून लेऑफ

Layoffs : तब्बल ७० हून अधिक कंपन्यांनी आर्थिक बाबींमुळे लेऑफचा पर्याय स्वीकारला आहे.
Startup Layoffs
Startup LayoffseSakal
Updated on

देशातील स्टार्टअप कंपन्यांना मिळणाऱ्या विदेशी गुंतवणुकीचा ओघ गेल्या काही महिन्यांपासून आटला आहे. त्याचा फटका स्टार्टअप कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना बसला असून, गेल्या सहा महिन्यांत १७ हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. ‘सीटीईएल’ कंपनीने जारी केलेल्या अभ्यास अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

स्टार्टअप्सना सर्वाधिक फटका

या अहवालानुसार, चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत ७० पेक्षा अधिक स्टार्टअप कंपन्यांनी सुमारे १७ हजार कर्मचारी कमी केले आहेत. या कंपन्यांमध्ये एडटेक, ई-कॉमर्स, फिनटेक, फूडटेक, हेल्थटेक अशा विविध क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांचा समावेश आहे. अनेक युनिकॉर्न स्टार्टअप कंपन्यांचाही यात समावेश आहे.

Startup Layoffs
Instagram Scam : इन्स्टावर सेलिब्रिटींचे फोटो लाईक करण्याची नोकरी; ठाण्यातील बेरोजगार तरुणाला घातला ३७ लाखांचा गंडा!

सहा एडटेक कंपन्या, ई-कॉमर्समधील १७, फिनटेकमध्ये, एपीआय बँकिंग उत्पादने, ब्रोकरेज आणि म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड, विमा आणि पेमेंट सोल्यूशन्स देणाऱ्या ११ स्टार्ट-अप कंपन्यांनी कर्मचारी कमी केले आहेत. फूडटेक, हेल्थटेक आणि लॉजिस्टिक सेवा, तसेच सास क्षेत्रातील अनेक स्टार्टअपनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

कंपन्यांसमोरील आव्हानं

निधीची कमतरता हे या कंपन्यांसमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. स्टार्टअपना त्यांची वाढ टिकवून ठेवणे आणि नवी गुंतवणूक आकर्षित करण्यातही अडथळे येत आहेत, त्यामुळे खर्च कमी करण्याच्या उद्देशाने त्यांनी कर्मचारी संख्या कमी करण्यावर भर दिला आहे, असे सीटीईएलच्या अहवालात म्हटले आहे. वाढता भांडवली खर्च, चढे व्याजदर, तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरचे मूल्य अशा विविध कारणांमुळे गुंतवणुकीचा ओघ आटत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Startup Layoffs
LinkedIn AI Coach : आता लिंक्डइनवर नोकरी शोधणं अन् अप्लाय करणं होणार सोपं; एआय टूल करणार मदत

गुंतवणूक झाली कमी

भारतातील स्टार्टअपना मिळणाऱ्या व्हेंचर कॅपिटलमध्ये २०२३ च्या पहिल्या सहामाहीत जोरदार घट झाली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गुंतवणुकीत ७९ टक्के घसरण झाली. फिनटेक, एडटेक आणि एंटरप्राइझ-टेक यांसारख्या क्षेत्रांवर याचा अधिक प्रभाव जाणवला.

व्हेंचर इंटेलिजन्सच्या आकडेवारीनुसार, या पहिल्या सहामाहीमध्ये एकूण गुंतवणूक केवळ ३.८ अब्ज डॉलर इतकी होती. मागील वर्षीच्या याच कालावधीत हे प्रमाण १८.४ अब्ज डॉलर होती. निधी गुंतवण्याबाबतच्या व्यवहारांची संख्याही लक्षणीयरित्या कमी झाली असून, ती मागील वर्षातील याच सहामाहीतील ७२७ वरून ६० टक्क्यांनी कमी होऊन केवळ २९३ वर आली आहे.

Startup Layoffs
Stock Market Crash: शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स 1,000 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.