MPSC कडून PSI चा अंतिम निकाल जाहीर, 494 नवे अधिकारी होणार दाखल

MPSC Declared PSI Result
MPSC Declared PSI Resulte sakal
Updated on

सोलापूर : स्पर्धा परीक्षांचे कोलमडलेले वेळापत्रक आणि निकालाची प्रतिक्षा, यामुळे पुण्यातील स्वप्निल लोणकर याने आत्महत्या केली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगात (MPSC) काही समस्या निर्माण झाल्या. पण, नवीन अध्यक्ष येताच आज पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल (PSI Result) जाहीर झाला आहे. त्यामुळे आता राज्याच्या पोलिस दलात 494 अधिकारी दाखल होतील.

MPSC Declared PSI Result
MPSC प्रशासकीय अधिकारी पदांसाठी भरती, असा करा अर्ज

कोरोनामुळे राज्यात निर्बंध होते. धोका वाढल्याने शाळा बंद होत्या, मुलांच्या परीक्षा ऑनलाईन झाल्या. त्यातच एमपीएससीच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणार्‍या विद्यार्थ्यांची अडचण निर्माण झाली. त्यातच परीक्षा वारंवार पुढे जात होत्या. पूर्वी झालेल्या परीक्षांचे निकाल रखडले होते. त्यावेळी उमेदवारांना आंदोलन करावे लागले. अधिवेशनामध्ये स्वप्निल लोणकर याचा मुद्दा उपस्थित झाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोगाचे सदस्य भरण्याची घोषणा केली. कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याकडे काही दिवस आयोगाचे अध्यक्षपद सोपविण्यात आले. पण, त्याठिकाणी किशोरराजे निंबाळकर आले आणि उमेदवारांना प्रश्न सुटतील अशी आशा लागली. त्यानुसार त्यांनी आता कामाचा धडाका सुरू केला आहे.

दरम्यान, राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये राज्यसेवेच्या माध्यमातून 405 पदे भरली जाणार आहेत. तर आता पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल आज जाहीर झाल्याने राज्याच्या पोलिस दलात 494 अधिकारी दाखल होतील. अंतिम परीक्षेसाठी 1040 उमेदवार होते. त्यातून 494 जणांची अंतिम निवड करण्यात आली. त्यात 340 पुरुष तर 154 महिला उमेदवार आहेत. विशेष बाब म्हणजे त्यातील एकानेही भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय निवडलेला नाही, असे आयोगाकडून सांगण्यात आले. आयोगाचे कामकाज गतिमान झाल्याने भावी अधिकारी आनंदी असल्याचे चित्र आहे.

आयोगाने यापूर्वी चार दिवसांत राज्य विक्रीकर निरीक्षक, राज्यसेवा परीक्षेची जाहिरात आणि दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी यांच्या मुलाखती घेऊन सर्वसाधारण निकाल जाहीर केला. तसेच आज पोलिस उपनिरीक्षक पदाच्या 494 जागांचा अंतिम निकाल जाहीर केला. इतकेच नाहीतर गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 3 एप्रिल रोजी घेण्याचे आयोगाने केले निश्चित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.