MPSC: लागा तयारीला! 'इतक्या' पदांसाठी जाहिरात झाली प्रसिद्ध, जाणून घ्या अर्जाची पध्दत

MPSC exam Advertisement released for recruitment of various 5 cadres check details here govt job
MPSC exam Advertisement released for recruitment of various 5 cadres check details here govt job mpsc
Updated on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवेच्या विविध 5 संवर्गाच्या पदभरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MPSC च्या अधिकृत ट्विटर हँडलवरू ट्विट करत याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान अर्ज करण्याची पद्धत, प्रवर्गनिहाय तपशील, आवश्यक अर्हता, वयोमर्यादा, आरक्षण, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशीलासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे तसेच सविस्तर जाहिरात वाचावी असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

अर्ज कधीपर्यंत करता येतील?

उमेदवारांना ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in या संकेतस्थळाद्वारे दिनांक २५ ऑक्टोबर, २०२२ ते दिनांक १४ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.

आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती व जाहिरात अधिकृत समजण्यात येईल असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

MPSC exam Advertisement released for recruitment of various 5 cadres check details here govt job
Rain Update: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! पुढच्या 36 तासांत मिळणार मॉन्सूनपासून सुटका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत खालील संवर्गातील पद भरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत:

वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर -०७ पदे

कार्यकारी अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-अ - ०३ पदे

अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब [ प्रशासन शाखा ] - ६५ पदे

औषधी निर्माता महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब आयुष संचालनालय, मुंबई- ०१ पद

सहायक (विधि), गट-ब (अराजपत्रित) -१२ पदे

MPSC exam Advertisement released for recruitment of various 5 cadres check details here govt job
Badlapur: पिकनिक जीवावर बेतली! कोंढेश्वर धबधब्यात बुडून घाटकोपरच्या चौघांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.