MPSC Exam : गट ‘ब’ आणि गट ‘क’च्या स्वतंत्र संयुक्त पूर्व परीक्षा होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा स्वतंत्रपणे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
MPSC Exam
MPSC Examsakal
Updated on

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा स्वतंत्रपणे घेण्याचा निर्णय घेतला आहे. विविध विभागांमधील एकूण ४८० पदांसाठी ‘गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ ५ जानेवारी २०२५ ला, तर एकूण एक हजार ३३३ पदांसाठी ‘गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ २ फेब्रुवारी २०२५ ला होणार आहे. या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात येत असल्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

आयोगामार्फत परीक्षा योजनेतील तरतुदीनुसार महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ पहिल्यांदाच एकत्रित आयोजित केली होती. या परीक्षेच्या निकाल प्रक्रियेदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणी व उद्‌भवलेली न्यायालयीन प्रकरणे आणि त्यामुळे निकाल प्रक्रियेस होणारा विलंब हे विचारात घेऊन परीक्षा योजनेमध्ये सुधारणा करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. त्यानुसार आयोगाने या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. आयोगाच्या संकेतस्थळावर या दोन्ही परीक्षांचा तपशील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अर्जाची अशी असेल प्रक्रिया -

तपशील : कालावधी

ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी : १४ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख : ४ नोव्हेंबर

चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्यासाठी मुदत : ६ नोव्हेंबर

चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम मुदत : ७ नोव्हेंबर

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ - https://mpsc.gov.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.