सोलापूर : यंदाच्या वर्षातील आठ महिने संपूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा व संयुक्त पूर्व परीक्षा घेतलेली नाही. आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखा चार वेळा जाहीर केल्या, पण प्रत्येक वेळी परीक्षा पुढे ढकलावी लागली. .त्यात कृषी विभागाच्या जागा समाविष्ठ झालेल्या नाहीत. दुसरीकडे शासनाकडून अजूनही सर्व मागणीपत्रे न आल्याने संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात देखील प्रसिद्ध झालेली नाही. सहा ते साडेसहा लाख विद्यार्थी या दोन्ही परीक्षेची तयारी करीत असून त्यातील अनेकांची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याची वस्तुस्थिती आहे.मागील वर्षी संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात फेब्रुवारीत प्रसिद्ध झाली आणि एप्रिलमध्ये परीक्षा पार पडली होती. तत्पूर्वी, राज्य सेवेची पूर्व परीक्षा देखील आयोगाने घेतली होती. मात्र, यावर्षी सप्टेंबर उजाडला तरी राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाला घेता आलेली नाही. .विद्यार्थ्यांचे आंदोलन, राज्य सरकारचे आदेश व मराठा आरक्षण, या कारणांमुळे परीक्षा चारवेळा पुढे ढकलावी लागली. तर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शासनाने सर्व विभागांकडील रिक्त पदांची मागणीपत्रे द्यावीत म्हणून आयोगाने सातत्याने पाठपुरावा केला, पत्रव्यवहारही केला. मात्र, अद्याप सर्व विभागांकडून मागणीपत्रे आयोगाला मिळाली नसल्याने संयुक्त पूर्व परीक्षा देखील मागील आठ महिन्यांत झालेली नाही.या सगळ्या गोंधळात तरूणांचे नुकसान होत असून त्यांना आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागत आहे. अनेकांची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने त्यांची ही शेवटची संधी असेल अशीही स्थिती आहे. ‘निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान’ याची आठवण आता ना आयोगाला ना सरकारला, अशीच सद्य:स्थिती आहे..तारखांत चार वेळा बदलराज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी दोन ते अडीच लाख विद्यार्थी बसले आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २८ एप्रिल रोजी होणार होती. पण, मराठा आरक्षणानंतर विद्यार्थ्यांना ‘ईडब्ल्यूएस’ऐवजी ‘एसईबीसी’ किंवा कुणबीचा पर्याय देण्यासाठी परीक्षा पुढे ढकलावी लागली. त्यानंतर ६ जुलै, २१ जुलै आणि आता २५ ऑगस्ट यावेळी होणारी नियोजित परीक्षादेखील पुढे ढकलावी लागली. आयोगाने २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलताना लवकरच तारीख कळवू असे पत्रातून स्पष्ट केले होते. मात्र, १० दिवस होऊनही आयोगाने नवीन तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे परीक्षा निवडणुकीमुळे दिवाळीनंतर होईल, असे बोलले जात आहे..‘आयबीपीएस’ परीक्षांच्या तारखा पाहून राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख निश्चित केली जाईल. कृषी विभागाच्या जागा त्यात समाविष्ठ करण्याचा निर्णय अजून झालेला नाही. तसेच संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शासनाकडून सर्व विभागांकडील रिक्त पदांची मागणीपत्रे मागविण्यात आली आहेत. ती आल्यानंतर या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होईल.- सुवर्णा खरात, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.